AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयंकरच! हवन करूनही लग्न जुळेना, त्याने असं काही केलं की ते ऐकून तुम्ही सुन्न व्हाल!

या हल्ल्यानंतर पुजारी शर्मा यांनी चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राधेश्याम विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी राधेश्याम याला अजून काही अटक करण्यात आलेली नाही.

भयंकरच! हवन करूनही लग्न जुळेना, त्याने असं काही केलं की ते ऐकून तुम्ही सुन्न व्हाल!
भयंकरच! हवन करूनही लग्न जुळेना, त्याने असं काही केलं की ते ऐकून तुम्ही सुन्न व्हाल!Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Updated on: Sep 30, 2022 | 5:37 PM
Share

भोपाळ: मध्यप्रदेशातील (madhya pradesh) इंदौर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चंदन नगरमध्ये (chandan nagar) एका व्यक्तीने एका पुजाऱ्याचा (priest) कानच कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चंदन नगरातील राधेश्याम यांच्या मुलाचं गेल्या अनेक वर्षापासून लग्नच ठरत नाहीये. त्यामुळे या उतावीळ मुलाच्या बापाला ओळखीच्या लोकांनी राजस्थानातील पुजारी अरुण शर्मा यांना भेटण्याचा सल्ला दिला. शर्मा यांच्याकडून घरी होम हवन करून घेतल्यास मुलाचं लग्न लवकर होईल, असंही सांगितलं. मात्र, हवन करूनही लग्न जमत नसल्याने या तरुणाने पुजाऱ्याचा कानच कापला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

राजस्थानचे पुजारी अरुण शर्मा यांची माहिती मिळाल्यानंतर राधेश्याम शर्मा यांनी अरुण शर्मा यांची सर्व माहिती काढली. त्यानंतर त्यांनी पुजारी अरुण शर्मा यांना फोन केला. अरुण यांनी राधेश्याम यांना घरी पूजा आणि हवन करण्यासाठी बोलावलं. पण राधेश्याम यांनी अरुण यांनाच मध्यप्रदेशात बोलावून घेतलं.

त्यामुळे ठरलेल्या दिवशी आणि वेळेत अरुण शर्मा मध्यप्रदेशातील राधेश्याम यांच्या घरी आले. हवन केलं. त्यानंतर ते राजस्थानला निघून गेले. त्यानंतर आता आपल्या मुलाचं लग्न लवकरच होणार या आशेने राधेश्याम निश्चिंत झाले होते.

होम हवन झाल्यानंतरही मुलाचं लग्न जमलं नाही. त्यामुळे राधेश्याम यांनी पुन्हा पुजारी शर्मा यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना घरी होम हवन करण्यासाठी घरी बोलावलं. त्यामुळे पुजारी शर्मा राधेश्याम यांच्या इंदौरमधील चंदन नगर येथील घरी पोहोचले.

या ठिकाणी त्यांनी पुन्हा होम हवन सुरू केला. मात्र, त्याच वेळी राधेश्याम आणि पुजारी अरुण शर्मा यांच्यात लग्नाच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला. त्यामुळे वाद एवढा वाढला की राधेश्याम यांनी आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने अरुण शर्मा यांचा कानच कापला.

या हल्ल्यानंतर पुजारी शर्मा यांनी चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राधेश्याम विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी राधेश्याम याला अजून काही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...