Nashik| प्रियकराच्या मदतीने पतीच्या ‘माये’वर पत्नीचा डल्ला; ऐकावं ते नवलच…!

एकीकडे पती आपल्या पत्नीची तक्रार सासू-सासऱ्यांना करत होता. तर दुसरीकडे त्याच दरम्यान पत्नी पतीच्या घरात हातसफाई करत होती.

Nashik| प्रियकराच्या मदतीने पतीच्या 'माये'वर पत्नीचा डल्ला; ऐकावं ते नवलच...!
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 12:27 PM

नाशिकः अगदी कधीही, कुठेही, काहीही होऊ शकते. नाते संबंध असो, की अजून काही. विश्वास ठेवण्याला कुठेही जागाच उरलेली नाही. नाशिकमध्ये चक्क पत्नीने आपला प्रियकर आणि भावाच्या मदतीने पतीच्या घराचे कुलूप तोडून तब्बल साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणाची सविस्तर माहितीही तितकीच रंजक आहे. एकीकडे पती आपल्या पत्नीची तक्रार सासू-सासऱ्यांना करत होता. तर दुसरीकडे त्याच दरम्यान पत्नी पतीच्या घरात हातसफाई करत होती.

इकडे पत्नीची तक्रार…

नाशिकमधल्या बेला डिसूजारोड येथील अरुण सटवाजी साखरे हे बुधवारी आपल्या मूळगावी जालन्यातील टेंभुर्णी येथे तपोवन एक्स्प्रेसने गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची दुसरी पत्नी, मुलगा, मुलगी होते. तिथे त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीचे एकेक कारनामे सासू आणि सासऱ्यांना सांगायला सुरुवात केली. आपल्या पहिल्या पत्नीचे दुसऱ्यासोबत कसे प्रेमसंबंध आहेत, याची माहिती दिली. शिवाय आपली पहिली पत्नी नंदकुमार रायझाडे याच्यासोबत राहत असल्याची माहिती दिली. तर इकडे पहिले पत्नी मात्र, आपल्या पतीच्या घरात हातसफाई करण्यात व्यस्त होती.

तिकडे घर साफ…

पती गावाला गेल्याचे माहिती होताच पहिली पत्नी नंदाने अरुण साखरे यांचे घर फोडले. त्यासाठी आपला भाऊ, प्रियकर यांची मदत घेतली. या साऱ्यांनी साडेपाच लाखांची रोकड, 70 हजारांचे मंगळसूत्र, तीन मोबाईल, चार साड्या असा साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. साखरे यांनी घर दुरुस्त करण्यासाठी चार लाख बँकेतून काढून आणून घरी ठेवले होते. याची कुणकुण त्यांच्या पहिल्या पत्नीला लागली होती. त्यामुळे तिने ते पैसेही लंपास केले. चोरीप्रकरणी अरुण साखरे यांच्या तक्रारीवरून त्यांची पहिली पत्नी नंदा, तिचा भाऊ सचिन साळवे, प्रियकर नंदकुमार रायझाडे यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

चोरीच्या घटनांत वाढ

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी तीन दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. लागोपाठ तीन खून घडले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.

इतर बातम्याः

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

नाशिक महापालिकेची प्रभागरचना फुटल्याचा आरोप; नगरसेवकाच्या घरात बसून स्वकियांचाही करेक्ट कार्यक्रम

Nashik | कोविड अनुदानासाठी मदत कक्ष; कोणती कागदपत्रे करावी लागणार सादर, घ्या जाणून…

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.