पत्नीचे दुसऱ्यावर प्रेम जडले, पतीने व्हिडिओ बनवत स्वतःला संपवले

हॉटेल व्यावसायिक असलेले कमल कलवानी हे मशिनी मार्केटमध्ये पत्नी आणि तीन मुलांसह राहत होती. कलवानी यांच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध सुरु आहेत.

पत्नीचे दुसऱ्यावर प्रेम जडले, पतीने व्हिडिओ बनवत स्वतःला संपवले
घरगुती वादातून हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्याImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 1:47 PM

भीलवाडा : पत्नीच्या प्रेम प्रकरणाला कंटाळलेल्या हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील भीलवाडा येथे घडली आहे. कमल कलवानी असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी कलवानी यांनी एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत त्यांनी आत्महत्येस पत्नी आणि बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कलवानी यांच्या भावाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल व्यावसायिक असलेले कमल कलवानी हे मशिनी मार्केटमध्ये पत्नी आणि तीन मुलांसह राहत होती. कलवानी यांच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध सुरु आहेत. कलवानी यांनी पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले होते.

व्हिडिओमध्ये काय म्हटलेय?

यानंतर पत्नीसह तिचा प्रियकर आणि पत्नीच्या घरचे त्यांना धमक्या देत आहेत. तू माझं काही करु शकत नाही, कायदा महिलांच्या बाजूने आहे. बायको भांडते, मारते पण.

हे सुद्धा वाचा

पत्नीच्या घरचे सांगतात, आमचे 50 लाख उत्पन्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही पोलीस स्टेशनला पैसे देतो. यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे कलवानी यांनी मृ्त्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

यानंतर कलवानी यांनी ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केली. रेल्वे ट्रॅकजवळ पोलिसांना मृतदेह आढळून आला. मृतदेहासोबत सापडलेल्या मोबाईलवरुन पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली.

पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रारही दाखल केली होती

मयत कलवानी यांचा पत्नी आणि तिच्या प्रियकराशी वादही झाला होता. याप्रकरणी कलवानी यांनी 27 ऑक्टोबर रोजी पोलिसात तक्रारही दाखल केली होती. विद्या आणि कमल यांच्या विवाहाला 18 वर्षे झाली आहेत.

आता कलवानी यांच्या फिर्यादीवरुन भंवरलाल दरगड, पंकज दरगड, मीना दरगड, कमलची पत्नी विद्या आणि मधु जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याता आला आहे. याप्रकरणी सिंधी समाजाने आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.