AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Crime : अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता मुलगा, क्रूर मातेने जे केले ते पाहून तुमचाही संताप अनावर होईल !

विवाहबाह्य संबंधाचे सत्य उघडकीस येऊ नये म्हणून तिने प्रियकराच्या मदतीने मुलाच्या हत्येचा कट रचला. यानुसार मुलाची हत्या करून नंतर त्याचा मृतदेह शेतामध्ये फेकण्यात आला. उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यामध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

UP Crime : अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता मुलगा, क्रूर मातेने जे केले ते पाहून तुमचाही संताप अनावर होईल !
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
| Updated on: Jan 20, 2023 | 11:51 PM
Share

बिजनौर : विवाहबाह्य संबंध उघड होतील या भीतीने एका महिलेने आपल्या पोटच्या गोळ्यालाच संपवल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे उघडकीस आली आहे. मुलाने आपल्या आईला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. याबाबत मुलगा वडिलांना सांगेल या भीतीने महिलेने हे कृत्य केले. संबंधित महिलेला आणि तिच्या प्रियकराला वेळीच कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सध्या परिसरातून जोर धरत आहे. स्थानिक पोलिसांनी संबंधित महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली असून, दोघांविरोधात हत्या तसेच अपहरणासह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

विवाहबाह्य संबंधाचे सत्य उघडकीस येऊ नये म्हणून तिने प्रियकराच्या मदतीने मुलाच्या हत्येचा कट रचला. यानुसार मुलाची हत्या करून नंतर त्याचा मृतदेह शेतामध्ये फेकण्यात आला. उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यामध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

एका जन्मदात्रीने आपल्या पोटच्या मुलालाच जिवंत मारल्याने हळहळ व्यक्त होत असून महिलेच्या कृत्यावर तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत असून मुलाच्या हत्या प्रकरणात आणखी कोणाची मदत घेण्यात आली आहे का? याचाही कसून तपास केला जात आहे.

मुलगा म्हणाला होता वडिलांकडे नाव सांगेन!

हत्या करण्यात आलेल्या मुलाचे वय अवघे दहा वर्षे होते. त्याचा गुन्हा केवळ हाच होता की त्याने आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. त्यानंतर मुलाने आईसमोर त्या कृत्याबद्दल बोलूनही दाखवले होते.

दहा वर्षांच्या मुलाला आईचे कृत्य खटकले होते. त्याने याबाबत वडिलांकडे नाव सांगणार असल्याचे बोलून दाखवले. त्यानंतरच महिलेने आपल्या अनैतिक संबंधाचा उलगडा होण्याआधीच मुलाची हत्या करण्याचा कट रचला.

मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.