AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Eng | गहुंजेजवळील क्रिकेट बेटिंगचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, वेस्ट इंडिजमधील स्टेडियम कर्मचारी रडारवर

पुण्याजवळील गहुंजे स्टेडियमजवळून 26 मार्च या दिवशी दुर्बीण आणि कॅमेऱ्यांचा वापर करत क्रिकेटवर बेटिंग करण्यात आले होते ( Gahunje Stadium Cricket bookies baiting )

Ind Vs Eng | गहुंजेजवळील क्रिकेट बेटिंगचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, वेस्ट इंडिजमधील स्टेडियम कर्मचारी रडारवर
गहुंजेजवळ क्रिकेटवर सट्टेबाजी प्रकरणात अटक झालेले बुकी
| Updated on: Apr 27, 2021 | 2:53 PM
Share

पिंपरी चिंचवड : पुण्याजवळील गहुंजे स्टेडियमजवळ झालेल्या क्रिकेट बेटिंगचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. वेस्ट इंडिज येथील एका इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील कर्मचाऱ्याचे नाव समोर आले आहे. भारत विरुद्ध इंग्लड सामन्यातील प्रत्येक बॉलवर डोंगरावरुन दुर्बिणीच्या माध्यमातून नजर ठेवली गेली होती. सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना पुण्यात मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. (India vs England Gahunje Stadium Cricket Match 33 bookies baiting International connection)

पुण्याजवळील गहुंजे स्टेडियमजवळून 26 मार्च या दिवशी दुर्बीण आणि कॅमेऱ्यांचा वापर करत क्रिकेटवर बेटिंग करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात वेस्ट इंडिज येथील एका इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील जॉन नामक कर्मचाऱ्याचे नाव समोर आले आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकामधील सामन्यांची माहिती तो भारतातील बुकींना पुरवत होता.

ज्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यादरम्यान या बुकींना रंगेहाथ अटक झाली होती, त्यापैकी पोर्तुगालचा आरोपी तेव्हा इंग्लंड येथील एकाला वारंवार अपडेट देत होता, असंही तपासात समोर आलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील 6 ते 13 सेकंदांचा फायदा घेत बेटिंग सुरू असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकरण?

भारत विरुद्ध इंग्लड क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या 33 बुकींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी गेल्या महिन्यात बेड्या ठोकल्या होत्या. गहुंजे क्रिकेट मैदानाच्या जवळील गोदरेज प्रॉपर्टी, घोरडेश्वर डोंगर आणि पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलमधून सट्टेबाज बुकींना पोलिसांनी अटक केली होती.

अडीच सेकंदाच्या डीलेचा फायदा

घोरडेश्वराच्या टेकडीवर जाऊन दुर्बिणीतून प्रत्येक चेंडूवर नजर ठेवून आठ बुकी प्रत्येक मिनिटाला सट्टा लावत होते. टीव्हीवर सामन्याचे थेट प्रक्षेपण हे दोन ते अडीच सेकंड लेट होते. त्यामुळे त्यांना सामन्यात काय झाले ते अडीच सेकंद अगोदर समजत असल्याने सट्टा लावणे सोपे पडत होते. त्यामुळे बुकींना अधिकच फायदा होत होता.

महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांतील बुकी

अटकेतील आरोपींमध्ये महाराष्ट्रातील 11, मध्य प्रदेशातील 5, हरियाणातील 13, राजस्थानातील 2, तर गोवा, पोर्तुगाल, उत्तर प्रदेश येथील प्रत्येकी एकाचा समावेश होता. अटक केलेल्या बुकींकडून 45 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामध्ये 74 मोबाईल, 3 लॅपटॉप, 8 कॅमेरे, दुर्बिणी, परदेशी चलन यांचा समावेश होता. आरोपी गहुंजे क्रिकेट मैदानाजवळच रहायला होते

संबंधित बातम्या :

डोंगरावरुन दुर्बिणीतून प्रत्येक बॉलवर नजर, पुण्यात ‘टीव्हीपेक्षा तेज’ सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना अटक

(India vs England Gahunje Stadium Cricket Match 33 bookies baiting International connection)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.