AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indias Got Latent:स्टँडअप कॉमेडीयन समय रैना याच्या वादग्रस्त शोवर कारवाई, जजेसवरही FIR

स्टँडअप कॉमेडीयन समय रैना याचा शो Indias Got Latent चा वाद वाढतच चालला आहे. या शोच्या ताज्या एपिसोडमध्ये सामील युट्युबर्स रणवीर इलाहाबादिया, आशीष चंचलानी, जसप्रीत सिंह आणि अपूर्वा मखीजा यांच्या विरोधात गुवाहाटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी एक्सवर पोस्ट करीत ही माहिती दिली आहे.

Indias Got Latent:स्टँडअप कॉमेडीयन समय रैना याच्या वादग्रस्त शोवर कारवाई, जजेसवरही FIR
| Updated on: Feb 10, 2025 | 10:07 PM
Share

स्टँडअप कॉमेडी शो Indias Got Latent वादात सापडला आहे. या शोमध्ये अलिकडेच रणवीर इलाहाबादिया, आशीष चंचलानी, जसप्रीत सिंह आणि अपूर्वा हे स्टँडअप कॉमेडीयन आले होते. यांच्या विरोधात आता गुवाहाटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांवर अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याच्या आरोप लावण्यात आला आहे. गुवाहाटी क्राइम ब्रँचने या प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आसामचे मुख्यमंत्र्‍यांनी या एफआयआर संदर्भात एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहीलेय की गुवाहाटी पोलिसांनी काही प्रमुख युट्युबर्स आणि सोशल मिडिया इंफ्लुएंसर्सच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्यांच्या बिभत्सपणा आणि अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. ज्या व्यक्तींच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला त्यांच्या विरोधात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची ओळख पटण्यासाठी पुढील कारवाई केली जात आहे. या प्रकरणाची संवदेनशिलता पाहाता या प्रकरणाची लवकरच सखोल तपास करुन कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले आहे.

येथे पोस्ट पहा –

दिल्ली आणि मुंबईत देखील तक्रार दाखल

ट्युबर्स समय रैना आणि रणवीर इलाहाबादिया सह इतर सर्व लोकांविरोधात तक्रार दाखल झाली आहे. सर्वात आधी हिंदू आयटी सेलने मुंबईत या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. यानंतर जिंदल नावाच्या वकीलाने दिल्लीत तक्रार दाखल केली आहे.

रणवीर इलाहाबादियाने माफी मागितली –

युट्युबर रणवीर इलाहाबादियाने या प्रकरणात माफी मागितली आहे. त्यांनी सोमवारी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करीत या प्रकरणात माफी मागितली आहे. त्याने कबूली दिली आहे की त्याची टिप्पणी योग्य नव्हती आणि विनोदी देखील नव्हती. त्याने आपल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीले की , ‘मी जे वक्तव्य केले ते करायला नको होते. मला माफ करा’ या व्हिडीओत त्याने म्हटलेय की मी कॉमेडीत माहीर नाही.आणि माझ्या चुकीबद्दल कोणताही बहाणा करणार नाही. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. यासाठी मी सर्वांची माफी मागत आहे.’

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...