AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एटीएम कार्ड बदलून ज्येष्ठ नागरीक आणि महिलांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा, 101 एटीएम कार्ड जप्त

ठाणे पोलीसांनी एटीएम कार्डद्वारे खात्यातून पैसे काढून लुबाडणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा छडा लावला आहे. या टोळीकडून तब्बल 101 एटीएम कार्डही जप्त केली आहेत.

एटीएम कार्ड बदलून ज्येष्ठ नागरीक आणि महिलांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा, 101 एटीएम कार्ड जप्त
ATM
| Updated on: Jan 17, 2023 | 9:40 AM
Share

मुंबई : महिलांना, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना हेरून ते एटीएम सेंटरवर पाळत ठेवून असायचे. कोणाला पैसे काढून हवे असतील तर मदत करण्याच्या बहाण्याने ते पुढाकार घ्यायचे. आणि पिन नंबर विचारून कार्ड अचानक बदलून नंतर खात्यातून पैसे काढून पसार व्हायचे. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली तसेच आजूबाजूच्या परीसरातील नागरीकांना लुबाडणाऱ्या एका आंतरराज्य एटीएम फ्रॉड करणाऱ्या टोळीचा भंडाफोड ठाणे खंडणी विरोधी पथकाने केला आहे. एका आंतरराज्यीय टोळीच्या चार सदस्यांना पोलीसांना जेरबंद केले असून एकूण आठ केसेसचा छडा लावला आहे.

या टोळीचे सदस्य ज्यांना एटीएम सेंटरमधून पैसे काढता येत नाहीत, त्यांना हेरून मदत करण्याच्या बहाण्याने लुटायचे. त्यांच्याकडून एटीएमचा पिन नंबर घेऊन त्यांचे कार्ड बदलून ते पैसे काढून पळायचे. या प्रकरणात पोलीसांनी तिघांना पंढरपूरातून आणि एकाला उल्हासनगरातून अटक केली आहे. सनी मुन्ना सिंग, (28), श्रीकांत गोडबोले, (28), हरिदास मगरे, (25) आणि रामराव शिरसाट, (35) यांना पोलिसांनी 70,000 रोख आणि ₹4.06 लाख किमतीची वाहनांसह अटक केली आहे.

भिवंडी येथील रुपाली सतीश बोईरे (32) यांचे एटीएम कार्ड एका व्यक्तीने बदलून तिच्या खात्यातून 38,500 रुपये काढून घेतल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली होती. आम्हाला गुप्त बातमीदारांकडून या आरोपींची माहिती मिळाली आणि त्यानुसार सापळा रचण्यात येऊन त्यांना अटक केल्याचे पोलीसांनी सांगितले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि तक्रारदारांचे सर्व एटीएम कार्डही जप्त केले आहेत. आम्ही आरोपींकडून चोरीची 101 एटीएम कार्डेही जप्त केली असल्याचे पोलीसांनी सांगितले.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.