AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident | प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांच्याच जीवावर बेतलं, जयपूरमध्ये ट्रॉलीवर कार धडकली, लोखंडी रॉड शरीराच्या आरपार… दुःखद!

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री उशिरा 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान दोन्ही डॉक्टर जयपूरमध्ये खरेदी करून घरी जात होते. यादरम्यान परिवहन नगर चौकाच्या अवघ्या 200 मीटर अगोदर ही कार ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर धडकल्याने मोठा अपघात झाला. यादरम्यान ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये लोखंडी रॉड असल्याने ते थेट कारचे काच फोडून आत गेले.

Accident | प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांच्याच जीवावर बेतलं, जयपूरमध्ये ट्रॉलीवर कार धडकली, लोखंडी रॉड शरीराच्या आरपार... दुःखद!
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 05, 2022 | 11:35 AM
Share

जयपूर : जयपूरमधील (Jaipur) घासगेटजवळ एक भीषण अपघात झालायं. रस्त्याने जाणारी कार अचानकच ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळल्याने 5 ते 7 फूट ट्रॉलीमध्ये असलेले लोखंडी रॉड गाडीची काच फोडून आत शिरले आणि पुढच्या शीटवर बसलेल्या डाॅक्टरांच्या अंगात घुसले. या अपघातात डॉ.प्रवीण व्यास यांचा मृत्यू (Death) झाला असून अन्य एक डॉक्टर गंभीर जखमी आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना जयपुरच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. आग्रा रोडवर असलेल्या अग्रवाल कॉलेजजवळ हा अपघात झाला.

दौसा येथील रहिवासी डॉ. प्रवीण व्यास यांचा जागीच मृत्यू

अपघातामध्ये शरीरात रॉड घुसल्याने दौसा येथील रहिवासी डॉ. प्रवीण व्यास यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालवत असलेले डॉ. अमित कुमार (37) यांच्या हाताला व डोक्याला मोठी दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच परिवहन नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले व जखमींना दवाखान्यात दाखल केले. सध्या जखमींवर जिल्हा रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

कार ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर धडकल्याने मोठा अपघात

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री उशिरा 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान दोन्ही डॉक्टर जयपूरमध्ये खरेदी करून घरी जात होते. यादरम्यान परिवहन नगर चौकाच्या अवघ्या 200 मीटर अगोदर ही कार ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर धडकल्याने मोठा अपघात झाला. यादरम्यान ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये लोखंडी रॉड असल्याने ते थेट कारचे काच फोडून आत गेले. पुढच्या शीटवर बसलेल्या दोन्ही डाॅक्टरांच्या अंगात हे राॅड घुसले.

मृत डॉक्टर खरेदीसाठी मित्रांसोबत आले होते जयपूरला

बाहेर खूप जास्त अंधार असल्याने गाडी चालवतांना रॉड दिसले नाहीत, असे सांगितले जात आहे. मृतांचे नातेवाईक आणि जखमी जयपूरला पोहोचले आहेत. डॉ. प्रवीण व्यास आणि डॉ अमित कुमार हे मित्रांसोबत खरेदीसाठी जयपूरला आले होते, असे नातेवाईकांनी सांगितले. काही मित्रांना थोडी घाई असल्याने ते पुढे निघून आले आणि डॉ. प्रवीण, डॉ अमित हे मागून निवांत निघाले. मृत डॉक्टर प्रवीण व्यास यांच्या पत्नी शिक्षिका असून त्यांना दोन मुले आहेत. प्रवीण जिल्हा रुग्णालयात दंतचिकित्सक म्हणून काम करत होते.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.