AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा “सैराट”.. 5 वर्षांपूर्वीच्या लव्ह मॅरेजचा असा उगवला सूड, जावयावर वार करत घरच्यांनीच पुसलं लेकीचं कुंकू, कुठे घडली मन सुन्न करणारी घटना ?

पाच वर्षांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा भयानक शेवट झाला आहे. मुकेश शिरसाठ या तरुणाचा त्याच्या सासरच्या लोकांनी कोयत्याने वार करून खून केला. मुलीच्या कुटुंबाला हा विवाह मान्य नव्हता आणि यामुळेच हा निर्घृण खून झाला. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.

पुन्हा सैराट.. 5 वर्षांपूर्वीच्या लव्ह मॅरेजचा असा उगवला सूड, जावयावर वार करत घरच्यांनीच पुसलं लेकीचं कुंकू, कुठे घडली मन सुन्न करणारी घटना ?
प्रेमविवाहातून तरूणाचा खून
| Updated on: Jan 20, 2025 | 1:24 PM
Share

कधी जुन्या भांडणाचा राग,कधी विवाहबाह्य संबंधांमुळे हत्या तर कधी आणखी काही…गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात दिवसढवळ्या खून, हत्या होण्याची प्रकरणं वाढतच असून त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण चांगलंच वाढलंय. राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असे प्रश्न पडावेत अशाच या घटनांनी सामान्य नागरिक मात्र हादरले आहेत. अशीच एक हादरवणारी घटना जळगावमध्येही घडली असून तेथे सासरच्या लोकांना आपल्याच लेकीच्या कपाळाचं कुंकू पुसत जावयाचा निर्घृण खून केलाय. आपल्या घरातील मुलीशी 5 वर्षांपूरवी केलेल्या लव्ह मॅरेजचा सूड उगवत कुटुंबियांनी तरूणाची हत्या केली. कोयत्याने वार करून त्याला संपवण्यात आलं. जळगावच्या पिंप्राळा हुडको येथे प्रेमविवाह केलेल्या 26 वर्षीय तरुणासह त्यांच्या कुटंबावर जुन्या वादातून हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे अख्खं शहर हादरलंय.या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मयत तरूणांच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मुकेश रमेश शिरसाठ असे मृत तरूणाचे नाव असून या निर्घृण हत्याकांडामुळे अख्ख्या शहरात खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये ‘सैराट’ सारखी घटना घडली आहे. मुकेश रमेश शिरसाठ याने जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील पूजा या तरूणीशी पळून जाऊन लग्न केलं. त्यांचं हे लव्ह मॅरेज मुलीकडच्यांना पसंत नव्हतं, यामुळे त्यांच्या मनात मुकेशबद्दल राग होता. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली तरी तेव्हापासूनच दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते, अजूनही ते वाद कायम होते.या वादाचे पर्यवसान रविवारी थेट हाणामारीत झाले. रविवारी मुकेश हा कामासाठी घराबाहेर पडला, तेव्हा त्याच्या सासरच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि त्याच्यावर कोयता व चॉपरने वार करत प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा जागीच मृत्यू झाला.

मुकेशवर हल्ला झाला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याचे भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण मध्ये आले, मात्र मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरही वार केल्याने तेही जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

परिसरात तणाव

या हत्याकांडाने अख्ख जळगाव हादरलं असून परिसरांत मोठा तणाव आहे. मुकेशच्या निर्घृण हत्येमुळे कुटुंबियांचा मोठा आक्रोश सुरू आहे. या घटनेमध्ये मयत तरुणाच्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांच्या वतीने आज आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.सध्या पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त तैनात केला असून अजूनही तणाव आहे. याप्रकरणी 10 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?