तिला नवरा आवडत नव्हता,लग्नाला झाले होते 45 दिवस, जंगलात बोलावलं अन्… त्या घनदाट आरण्यात नेमकं काय घडलं?
झारखंडमधील पलामू येथे, एका 16 वर्षीय वधूने प्रियकराच्या साथीने तिच्या नवऱ्यासोबत जे केलं ते पाहून कोणालाही धक्का बसेल. तिला नवरा आवडत नव्हता म्हणून मुलीने धक्कादायक पाऊल उचललं.

झारखंडमधील पलामू येथे एका मुलाने आपल्या एका मुलीशी मोठ्या उत्साहात लग्न केलं पण नियतीला काही औरच मान्य होतं. लग्नाला दीड महिने झाले होते. पण त्याला हे माहित नव्हते की ज्याच्यासोबत त्याने आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली होती तिच त्याचा जीव घेईल. नवरीला नवरा म्हणून हा मुलगा आवडत नव्हता. तिचं दुसऱ्यावरच कोणावर प्रेम होतं. नवऱ्या मुलाल मात्र याची काहीह कल्पना नव्हती. कुटुंबाच्या दबावाखाली येऊन या मुलीने लग्न केलं होतं. परंतु नंतर तिच्या प्रियकराच्या मदतीने तिने तिच्या पतीची हत्या केली.
प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीला मारण्याचा कट रचला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचे होते, परंतु तिच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावून दिले. लग्न झाल्यानंतर, मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीला मारण्याचा कट रचला आणि 31 जुलै रोजी त्याला संपवलं. ही घटना नवजयपूर पोलिस स्टेशन परिसरातील सिंजो गावात घडली आहे.
दीड महिन्यापूर्वी लग्न झाले
पलामूच्या पोलिस अधीक्षक रेश्मा रमेशन यांनी सांगितले की, ही मुलगी पलामूच्या नवजयपूर पोलिस स्टेशन परिसरातील सिंजो येथील रहिवासी आहे. तिचे लग्न 22 जून रोजी सरफराज नावाच्या मुलाशी झाले होते. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर दोघेही वेगळे राहत होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पत्नीने तिचा पती सरफराजला जंगलात बोलावलं. पतीही तिला भेटायला गेला. पण पत्नीसोबत तिचा प्रियकरही तिथे आला होता. पत्नी आणि तिच्या प्रियकराने त्याला फसवून जंगलात बोलावलं आणि दगडांनी ठेचून त्याची हत्या केली.
फरार प्रियकराचा शोध सुरूच
पोलिसांनी पतीच्या हत्येच्या आरोपाखाली पत्नीला अटक केली आहे. एसपी रेश्मा रमेशन यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. मृतक लातेहार जिल्ह्यातील मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील दही गावातील रहिवासी होता. पत्नीने जंगलात त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पानांनी झाकून टाकण्यात आला. पोलिसांनी सांगितले की मुलीने हे कबुल केले आहे की तिला तिच्या प्रियकराशी लग्न करायचे होते आणि तिने तिच्या पतीला मारण्याचा कट रचला होता. आरोपी मुलीचा प्रियकर सध्या फरार असून त्याला पकडण्यासाठी सध्या पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रियकराला देखील लवकरच अटक केली जाईल.
