5

पती हाय का हैवान ! बायकोला विहीरीत ढकललं, जीव वाचवण्यासाठी ती हातपाय मारू लागली तर तोच पाण्यात उतरला आणि…

एका पतीने त्याच्या पत्नीला विहीरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्याच्या पत्नीने स्वत:चा जीव वाचवायचा प्रयत्न केला असता, त्या तरूणाने पाण्यात उडी मारली आणि...

पती हाय का हैवान ! बायकोला विहीरीत ढकललं, जीव वाचवण्यासाठी ती हातपाय मारू लागली तर तोच पाण्यात उतरला आणि...
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 2:37 PM

रांची | 18 सप्टेंबर 2023 : जन्मभर साथ देण्याचे वचन देणाऱ्या पतीने मध्येच साथ सोडली तर ? आणि त्यानेच आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला तर ? विचारही करवत नाही ना ! पण हे एका महिलेसोबत खरोखर घडलं आहे. ज्याच्यासोबत सप्तपदी घेऊन सात जन्म एकत्र रहायचं वचन दिलं-घेतलं, तोच पती जीवावर (husband killed wife) उठल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका पतीने त्याच्याच पत्नीचा जीव घेतला असून यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली आहे.

झारखंडची राजधानी असणाऱ्या रांची जवळील कारोजोरा गावात एका सनकी युवकाने हे कृत्य केले आहे. त्याने त्याच्या पत्नीला विहीरीत बुडवून मारलं आहे. आणि हे सगळं का केल, त्यामागचं कारण ऐकून तर तुम्ही अक्षरश: हैराण व्हाल. बायकोने नशा करण्यास मनाई केली, म्हणून संतापाच्या भरात त्याने तिचा जीवच घेतला. त्याच्या पत्नीचा आरडाओरडा ऐकून इतर गावकरी तेथे आले व त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला अटक केली. महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

का केली हत्या ? 

पोलीस चौकशीत आरोपीने त्याचे नाव अफसर शेख असल्याचे सांगितले. त्याला ड्रग्सचे व्यसन आहे,पण त्याची पत्नी नूर फातिमा ही त्याला ड्रग्ज घेण्यापासून रोखत असे. यामुळे तो अस्वस्थ झाला. त्यामुळेच त्याने हे कृ्त्य केले. शनिवारी त्याने प्रथम पत्नीला पाण्याने भरलेल्या विहिरीत ढकलले. त्याची पत्नी मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. बचावासाठी हातपाय मारू लागली हे पाहून आरोपीने स्वतः विहिरीत उडी मारली आणि तिचा मृत्यू होईपर्यंत तिचं डोकं पाण्याखाली दाबून ठेवलं.

तर दुसरीकडे महिलेचा आरडाओरडा ऐकून गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि तिला पाण्यातून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पाण्यात बुडून त्या महिलेचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती बेदो पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यातjharkhand newsघेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, तेथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

झारखंडमध्ये घडलेला हा काही पहिलाचा प्रकार नाही. काही दिवसांपूर्वीच चतरा जिल्ह्यातील एका तरुणाने पत्नी आणि आईवर रॉकेल शिंपडून त्यांना पेटवून दिले होते. यामध्ये या दोन्ही महिलांचा मृत्यू झाला होता.

आपके लिए
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'
वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती
वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती