कल्याणमध्ये तलवार हल्ला थांबण्याचे नावच घेत नाही, तीन दिवसात दुसरी घटना

कल्याणमध्ये गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. भरदिवसा दहशत माजवणे, जीवघेणे हल्ले हे तर आता नेहमीचेच झाले आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कल्याणमध्ये तलवार हल्ला थांबण्याचे नावच घेत नाही, तीन दिवसात दुसरी घटना
हातात तलवार घेतलेल्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरलImage Credit source: Social
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 10:17 PM

सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : मुंबई-ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या कल्याण शहरात अलीकडच्या दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वी तलवारबाजांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला होता. ती घटना ताजी असतानाच सूचक नाका परिसरात भरदिवसा हातात तलवार घेऊन एक जण फिरत असल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर या तरुणावर चौघांनी हल्ला केला. लागोपाठ घडलेल्या या हल्ल्याच्या घटनांनी कल्याण शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलीस यंत्रणा असमर्थ ठरल्याचे चित्र आहे. पोलिसांचा धाक न राहिल्यामुळे तलवारीच्या मदतीने प्राणघातक हल्ले, गाड्यांची तोडफोड करणे हे प्रकार वाढले आहेत.

सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल

तलवारबाजांनी कल्याण पूर्वेकडील परिसरात हैदोस घालून दहशत माजवली आहे. तीन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास नांदिवली परिसरात दोन तरुणांवर तलवारीने फिल्मी स्टाईल हल्ला करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक करून अधिक तपास सुरु ठेवला आहे.

याचदरम्यान पुन्हा एका तरुणावर तलवारीने हल्ला झाल्यामुळे परिसरात तलवार टोळीची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ज्या तरुणावर हल्ला झाला, तो तरुण सुरुवातीला हातातील तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत होता, असेही सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले आहे. शमीम शेख उर्फ बाबू जंगली असे तरुणाचे नाव असून नंतर काही तरुणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला.

हे सुद्धा वाचा

कोळसेवाडी पोलिसांच्या हद्दीत लागोपाठ घटना

याआधी नांदिवली परिसरात दोघांवर झालेल्या तलवारीच्या हल्ल्याची घटना कोळसेवाडी पोलीस ठाण्यातच नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा सूचक नाका परिसरात तलवार टोळीने दहशत निर्माण केली. याप्रकरणी देखील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लागोपाठ एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घटना घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

सूचक नाका परिसरात हल्ल्यात जखमी झालेल्या शमीम शेखविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. परिसरात त्याची प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर रात्रीच्या सुमारास जुन्या वादातून तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी तलवारबाजांना रोखण्यासाठी वेळीच कठोर कारवाईची पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.