AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करायचे, पण पोलीस सतर्क झाले अन्…

रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढत चालल्या होत्या. यामुळे पोलीस अॅक्शन मोडवर आले आणि गुन्हेगारांचे धाबे दणाणले.

रेल्वे स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करायचे, पण पोलीस सतर्क झाले अन्...
रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी करणाऱ्या सात जणांना अटकImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: May 24, 2023 | 7:39 AM
Share

कल्याण : कल्याण आणि आसपासच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढल्या आहेत. सोमवारी दिवसभरत कल्याण आणि शहाड रेल्वे स्थानकावर एकूण 11 मोबाईल चोरी झाल्याच्या घटना घडल्या. यामुळे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले अन् कल्याण लोहमार्ग पोलिसांनी विविध पथक बनवत गेल्या 24 तासात सात आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून 10 मोबाईल आणि 2 पाकिटं हस्तगत केले आहे. कल्याण शहाड उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करायचे. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. आरोपींकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

गेल्या काही दिवसांपासून कल्याण, शहाड, उल्हासनगर रेल्वे चालक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी दिवसभरात कल्याण रेल्वे स्थानकातून 10 प्रवाशांचे मोबाईल तर शहाड येथून एक मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली. यानंतर कल्याण लोहमार्ग पोलीस ॲक्शन मोडवर आले. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांचे एक पथक नेमण्यात आलं.

24 तासात सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या

दिवसभरातील रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासत, खबऱ्यांकडून माहिती घेत अवघ्या 24 तासात तब्बल सात आरोपींना बेड्या ठोकत, त्यांच्याकडून 10 मोबाईल हस्तगत करण्यात आले. अहमद शेख, विशाल काकडे, मोहम्मद हसन अन्सारी, सरजील अन्सारी, सचिन गवळी, मंगल अली शेख, संदीप भाटकर अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हे सातही आरोपी सराईत चोरटे असून, त्यांच्या विरोधात या आधी देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ