AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्यूशनला जायला सांगताच अभिनेत्रीचा मुलगा भडकला, 57 व्या मजल्यावरून थेट… अभिनेत्रीच्या मुलाने काय केलं ?

कांदिवलीतील सिद्धा सीब्रुक इमारतीत १४ वर्षांच्या मुलाने ५७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या आईने ट्यूशनला जाण्यास सांगितल्यावर त्याचा संताप झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मुलगा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिस तपास करत आहेत.

ट्यूशनला जायला सांगताच अभिनेत्रीचा मुलगा भडकला, 57 व्या मजल्यावरून थेट... अभिनेत्रीच्या मुलाने काय केलं ?
कांदिवलीत घडली भयानक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 03, 2025 | 8:41 AM
Share

मुंबईच्या कांदिवली येथे एक अत्यंत भयानकक घटना घडली असून प्रचंड खळबळ माजली आहे. 14 वर्षांच्या मुलाला, त्याच्या आईने ट्यूशनला जाण्यास सांगितलं. मात्र ते ऐकून तो मुलगा संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने असं काही केलं ज्यामुळे अख्खं शहर हादरलं आहे. आईने ट्यूशनल जाण्यास सांगितल्यावर बडकलेल्या मुलाने राहत्या इमारतीच्या 57 व्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि आयुष्य संपवत आत्महत्या केली. संतापाच्या भरात त्याने हे टोकाचं पाऊल उचलून जीव दिल्याने सर्वांनाचा मोठा धक्का बसला असून त्याच्या या अकस्मात मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. 14 वर्षांचा हा मुलगा त्याच्या आई-वडिलाचं एकुलता एक अपत्य होता. मात्र आपल्या या कृतीमुळे काय होईल, आई-वडिलांवर काय आभाळ कोसळेल याचा जराही विचार न करता त्याने स्वत:ला 57 व्या मजल्यावरून खाली झोकून दिलं आणि आत्महत्या केली. याप्रकरणी कांदिवली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून , या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

अभिनेत्रीच्या मुलाचे टोकाचे पाऊल

पोलिसांकडूम मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडे Siddha Seabrook नावाची एक हाय प्रोफाईल इमारत आहे. सदर मुलगा हा त्याच इमारतीमध्ये रहात होता. त्याची आई ही गुजराती टीव्ही मालिकांमध्ये काम करते आणि तिच्या पतीपासून डिव्होर्स घेतला असून त्यानंतर ती चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या एका पुरूषासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते. ती महिला आणि तिचा मुलगा हे नुकतेच कांदिवलीतील या आलिशान घरात शिफ्ट झाले होते.

बुधवारी संध्याकाळी या 14 वर्षांच्या मुलाला त्याच्या आईने, त्या अभिनेत्रीने ट्यूशनला जाण्यास सांगितले. मात्र ते ऐकून तो मुलगा संतापला आणि त्याने ५७ मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करणारा मुलगा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मुलाच्या या कृत्याने त्याच्या आई-वडिलांना अतिशय धक्का बसला आहे. सध्या कांदिवली पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.