AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले, त्याने थेट ठोसा मारुन… नेमकं काय घडलं? पोलिसही हादरले

Karnataka Wife Murder: एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पतीने पत्नीला सोबत झोपण्यास बोलावले होते. दोघे एकत्र तर झोपले पण काही कारणावरुन भांडण झाले. त्यानंतर पतीने जे कृत्य केलं ते ऐकून पोलिसही हादरले.

नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले, त्याने थेट ठोसा मारुन... नेमकं काय घडलं? पोलिसही हादरले
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 13, 2025 | 3:58 PM
Share

नवरा आणि बायकोमधील भांडणे हे काही नवीन नसतात. त्यांच्यामध्ये भांडणे होतात आणि नंतर ते पुन्हा एकत्र देखील येताना दिसतात. पण सध्या नवरा-बायकोमधील भांडण अगदी टोकाला गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नवरा-बायकोमधील झोपण्याच्या मुद्द्यावरून भांडण इतके वाढले की नवऱ्याने बायकोवर थेट हात उचलला. त्याने ठोसा मारून तिचा जीवच घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया..

म्हणतात की पती-पत्नीमध्ये भांडणे-तंटे तर होतच असतात, पण यादगीर जिल्ह्यात घडलेला प्रकार ऐकून प्रत्येकजण थक्क झाले. येथे एकत्र झोपण्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमधील भांडण इतके वाढले की पत्नीचा जीव गेला. ही घटना हुनासगी तालुक्यातील बुडागुम्पर डोड्डी गावात घडली, ज्याने संपूर्ण परिसर हादरला.

वाचा: निर्लज्जपणाचा कळस! भर दिवसा शिवाजी पार्कमध्ये किळसवाणे कृत्य, Video पाहून तुमचाही राग होईल अनावर

दोन वर्षांचे लग्न, पण मतभेद निर्माण झाले

21 वर्षीय अय्यम्मा आणि तिचा पती अमरेश गुडागुंती यांचे लग्न फक्त दोन वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंतर त्यांच्यामध्ये मुलांबाबत चिंता होती, कारण त्यांना अजूनही मूल झाले नव्हते. याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद आणि भांडणे होत होती. पोलिसांच्या मते, 11 ऑगस्तच्या रात्री अमरेशने आपल्या पत्नीला एकत्र झोपण्यासाठी बोलावले. पण अय्यम्माने नकार दिला. याच गोष्टीवरून अमरेशला इतका राग आला की त्याने अय्यम्माला कोपर आणि मुक्क्यांनी मारले. जोरदार मार लागल्याने अय्यम्मा तिथेच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी केला खुलासा

घटनेची माहिती मिळताच कोडायकल पोलिस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि अहवालात स्पष्ट झाले की हा खुनाचा प्रकार आहे. पोलिसांनी आरोपी अमरेश गुडागुंती याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

गावात शोकाकुल वातावरण

बुडागुम्पर डोड्डी गावातील लोक या घटनेने हैराण आणि दु:खी आहेत. अवघ्या दोन वर्षांच्या लग्नात इतके मोठे पाऊल उचलले गेल्याने गावात चर्चेचा माहौल आहे. एका ग्रामस्थाने सांगितले, “पती-पत्नीमध्ये भांडणे तर होतात, पण कोणालाही वाटले नव्हते की हा प्रकार जीव घेण्यापर्यंत जाईल.”

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक