आत्याच्या नवऱ्याकडून आईवर बलात्काराचा प्रयत्न, अल्पवयीन बहिणींनी 70 वर्षांच्या नराधमाला संपवलं

आत्याच्या नवऱ्याकडून आईवर बलात्काराचा प्रयत्न, अल्पवयीन बहिणींनी 70 वर्षांच्या नराधमाला संपवलं
प्रातिनिधिक छायाचित्र.

आत्याचा नवरा आपल्या आईवर जबरदस्ती करत असल्याचं दोघी मुलींच्या लक्षात आलं. दोघींनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नव्हता. त्यामुळे बहिणींनी त्याला जीवे ठार मारलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 29, 2021 | 2:09 PM

तिरुअनंतपुरम : आईवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आत्याच्या नवऱ्याची दोघी मुलींनी हत्या केली. केरळमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 70 वर्षांच्या वृद्धाचा दोन अल्पवयीन बहिणींनी जीव घेतला. 15 आणि 16 वर्षाच्या दोघी जणींनी हत्येनंतर काकाचा मृतदेह विहिरीत टाकला. त्यानंतर आईच्या साथीने अंबालवयाल पोलिसात आत्मसमर्पण केले.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन मुलींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी त्या दोघी घरातच खेळत होत्या. त्यावेळी आत्याचा नवरा आपल्या आईवर जबरदस्ती करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दोघींनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नव्हता. त्यामुळे दोघींनी त्याला जीवे ठार मारलं.

हत्येनंतर मृतदेह विहिरीत फेकला

मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हत्येनंतर आईच्या मदतीने दोघींनी त्याचा मृतदेह एका गोणीत भरला आणि वायनाडमधील विहिरीत फेकून दिला. हत्येनंतर आईच्या साथीने केरळमधील अंबालवयाल पोलिसात त्यांनी आत्मसमर्पण केले.

मयत वृद्धाच्या दोन पत्नी आणि मुलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलींच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाईगिरी, तालुकाध्यक्षाची महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण

बीडमध्ये जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा, भाजप जिल्हाध्यक्षांसह 51 जणांवर गुन्हा

खोदता खोदता पहाड सापडे? आता जैनच्या कन्नौजच्या घरातून 19 कोटी रोख सापडले, 23 किलो सोने

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें