AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नकार पचला नाही, माथेफिरूचा अल्पवयीन मुलीवर हल्ला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

दिवसाढवळ्या, भर रस्त्यात, गर्दीच्या वेळेस हा धक्कादायक प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आरोपीने त्या मुलीला आधी पकडले आणि मागे ढकलून तिच्यावर वार केला. ती मदतीसाठी आरोडत होती पण...

नकार पचला नाही, माथेफिरूचा अल्पवयीन मुलीवर हल्ला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Sep 28, 2023 | 5:08 PM
Share

तिरुअनंतपुरम | 28 सप्टेंबर 2023 : प्रेमात लोकं आंधळी होतात हे खरं आहे. काही लोकांना त्यांचं प्रेम मिळत पण काहीजण तेवढे नशीबवान नसतात. काहींना प्रेमात नकार मिळतो, पण तो त्यांना पचवता येत नाही. आपल्याला नकार मिळाल म्हणजे काय ? असा विचार करत त्यांचा अहंकार दुखावला जातो. आणि त्याच रागाच्या भरात ते काहीही करू शकतात. अशीच एक घटना कोझिकोडे येथे घडली आहे. तेथे एका माथेफिरूने अल्पवयीन मुलीवर चाकूने (man stabbed minor girl) वार करत तिला गंभीर जखमी केले.

केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यात दिवसा ढवळ्या ही घटना घडली आहे. अर्शद असे आरोपीचे नाव असून तो 28 वर्षांचा आहे. अवघ्या 17 वर्षांच्या मुलीने प्रपोजल नाकारल्याच्या रागात त्याने हे कृत्य केल. भररस्त्यात, गर्दीच्या वेळेस त्याने तिच्यावर चाकूने वार केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ सओशल मीडियावरही व्हायरल झाला असून माथेफिरूच्या या कृत्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

कुठे घडली ही घटना ?

हृदयाचा थरकार उडवणारा हा संपूर्ण धक्कादायक प्रकार केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यातील नाडापुरम येथे घडला. आरोपीने पीडित तरूणीचा हात धरून ओढले, त्यानंतर तिला मागे ढकलून चाकूने सपासप वार केले, हे सर्व दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाले. कराची ओल्ड मार्केटमध्ये भरदुपारी, २ वाजताच्या सुमारास, भरगर्दीत हा हल्ला झाला.

स्थानिकांनी घेतली मदतीसाठी धाव

आरोपी अर्शदने त्या अल्पवयीन मुलीवर हल्ला करण्यापूर्वी तिला मारहाणही केली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने धारदार चाकूचा वापर करत तिच्यावर वार केला. हा प्रकार ज्या रस्त्यावर घडत होता, तेथे एक युवक बाईकवर उभा होता. मुलीवर हल्ला होताना दिसताच त्याने तिच्या मदतीसाठी धाव घेतल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. तसेच आजूबाजूच्या स्थानिक दुकानदारांनी देखील वेळीच धाव घेत हल्लेखोराला रोखले आणि मुलीला वाचवले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, बाईकवर जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने अर्शद मुलीवर हल्ला करत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. जवळच्या व्यापाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून मुलीची सुटका केली.

त्या मुलीच्या हातावर गंभीर जखमा

या हल्ल्यात ती अल्पवयीन मुलगी जखमी झाली. आरोपीने तिच्यावर चाकूने वार केला. तिच्या हातावर गंभीर जखमांचे व्रण असून बराच रक्तस्त्रावही झाला. हल्लेखोराला रोखल्यानंतर स्थानिकांपैकीच काहींनी तिला उपचारांसाठी तातडीने तालुक्याच्या रुग्णालयात नेले. आरोपीला रोखण्याचा प्रयत्न करत असताना, तेथील एका स्थानिक दुकादारही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित मुलीचे काही महिन्यांपूर्वी आरोपी अर्शदशी लग्न ठरले होते. मात्र तिला लग्नच करायची इच्छा नव्हती. म्हणूनच तिने अर्शदशी ठरलेले लग्न मोडले. यामुळे अर्शद खूप संतापला. तो सतत पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना धमकी देत लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. यामुळे ते सर्व जण खूप वैतागले आणि राहती जागा सोडून दुसऱ्या जागी शिफ्टही झाले. पण तरीही अर्शदने त्या मुलीचा पिछा काही सोडला नाही. तो तिचा सतत पाठलाग करायचा.

घटनेच्या दिवशीदेखील तो तिच्या मागे लागून लग्नासाठी आग्रह करू लागला. तिने नकार दिल्यावर त्याने चाकूने तिच्यावर वार करत हल्ला केला. हा हल्या अतिशय सुनियोजित असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान पीडित मुलीवर तालुक्याच्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.