AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सियानंतर उर्मिलाचं भयानक कांड; लग्नाच्या 3 दिवसाआधी होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, धक्कादायक कारण समोर

niraj hajra news : केतन अग्रवाल हत्याकांडानंतर आता झारखंडमध्येही भयंकर कांड उघडकीस आलं आहे. उर्मिला नावाच्या आरोपीने होणाऱ्या नवऱ्याला संपवल्याची घटना घडली आहे.

सियानंतर उर्मिलाचं भयानक कांड; लग्नाच्या 3 दिवसाआधी होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, धक्कादायक कारण समोर
| Updated on: Jul 14, 2026 | 10:22 AM
Share

पुण्यातील सिया आणि चेतनने मिळून केलेलं केतन अग्रवाल हत्याकांड चर्चेत असताना आणखी एक भयानक कांड उघडकीस आलं आहे. झारखंडच्या गिरीडीहमध्ये एका तरुणीने होणार्‍या नवऱ्याची लग्नाच्या तीन दिवस आधीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तरुणीचे बहिणीच्या नवऱ्यासोबत प्रेमसंबंध होते. या नात्यात होणाऱ्या लग्नामुळे अडथळा निर्माण होत असल्याने दोघांनी मिळून हत्या करण्याचा कट रचला. दोघांनी मिळून हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकून दिला. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यातील जमुआ पोलीस स्टेशनमधील हे प्रकरण आहे. भिखोडीह गावातील 21 वर्षीय नीरज हाजरा हा 5 जुलै रोजी अचानक घरातून बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी नीरज हा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून शोध सुरू केला. काही दिवसांनी नीरजचं अपहरण झालं असावं, असा संशय त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला. यामुळे पोलिसांनी अधिक गांभीर्याने तपासाला सुरुवात केली.

गिरीडीहचे पोलीस अधीक्षक डॉ. विमल कुमार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक गठीत करण्याचे आदेश दिले. पथकाने त्याचं मोबाईल लोकेशन, कॉल डिटेलची माहिती जाणून घेतली. यावेळी तपासात पोलिसांना महत्वाचे पुरावे सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरूच ठेवला. गिरीडीहचे पोलीस त्याच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनचा शोध घेत बिहारच्या जमुई जिल्ह्याच्या बिचकोडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेला जंगलात पोहोचले. त्यानंतर या जंगलात काही दिवसांपूर्वी एकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. जंगलातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा नीरज हाजराचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे नीरजची हत्या झाल्याचे उघड झाले.

लग्न ठरल्यानंतर रचला हत्येचा कट

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गिरीडीहच्या गमतरिया गावातील उर्मिला कुमारीचं तिचा दाजी सुभाष पासवानशी प्रेमसंबंध होते. दोघे जण अनेक महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांचे प्रेमसंबंध सुरू असताना घरातील सदस्यांनी उर्मिलाचं लग्न नीरज हाजराशी ठरवलं. दोघांच्या लग्नासाठी फक्त 3 दिवस उरले होते. परंतु उर्मिलाला नीरजशी लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे तिने दाजीच्या साथीने नीरजची हत्या करण्याचं ठरवलं. दोघांनी नीरजची हत्या करून बिहारच्या जंगलात मृतदेह फेकला. दोघांनी मिळून पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात दोघांचा गुन्हा उघडकीस आला.

Follow Us
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!