टेनिस बॉलमधून कैद्यांना गांजाचा पुरवठा, पुण्यातील तिघांना कोल्हापुरात अटक

कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात टेनिस बॉलमधून गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

टेनिस बॉलमधून कैद्यांना गांजाचा पुरवठा, पुण्यातील तिघांना कोल्हापुरात अटक

कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात टेनिस बॉलमधून गांजा पोहोचवण्याचा (Supplying Marijuana From A Tennis Ball) प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने गांजा कारागृहात पोहचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली (Supplying Marijuana From A Tennis Ball).

वैभव कोठारी, संदेश देशमुख आणि अमित पायगुडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही पुण्याचे असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून तीन टेनिस बॉल आणि 15 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबा कारागृहाच्या उत्तरेकडील बाजूच्या भिंतीजवळ तिघेजण टेनिस बॉलने क्रिकेट खेळत होते. त्यांच्या संशयास्पद हालचालीवरुन कारागृहातील काही कर्मचाऱ्यांना त्याचा संशय आला आणि त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे कापून पुन्हा चिकटवलेले तीन टेनिस बॉल आढळून आले.

या बॉलची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचं निदर्शनास आलं. वैभव कोठारी संदेश देशमुख आणि अमित पायगुडे अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून हे तिघेही पुण्याचे आहेत. या तिन्ही संशयितांच्या मित्राचा भाऊ एका गुन्ह्यामध्ये कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. आज सकाळी हे तिघे कारागृहात त्याला त्याला भेटले. त्यानंतर कारागृहाच्या बाजूला क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने त्यांनी टेनिस बॉलमधून त्याला गांजा पुरवण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात स्पष्ट झालं.

दरम्यान, या संशयितांनी याआधी असे काही प्रकार केले आहेत का, याचा तपास आता जुना राजवाडा पोलीस करत आहेत. कारागृहात गांजा पोहोचवण्याच्या या नव्या प्रकारामुळे मात्र पोलीस देखील चक्रावले आहेत.

Supplying Marijuana From A Tennis Ball

संबंधित बातम्या :

वसई-विरार-नालासोपारा, ठाणे, मुंबईतील वाहन चोरणारी टोळी गजाआड, 13 लाखांच्या गाड्या जप्त

सहा वर्षीय मुलाचं अपहरण, 18 तासात सुटका, सोलापूर पोलिसांची कारवाई