AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: ‘सलमान खानला धमकी दिली होती, पण…’ लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर

धमकीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तुरुंगात असलेल्या गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईची (Lawrence Bishnoi) चौकशी केली. या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Salman Khan: 'सलमान खानला धमकी दिली होती, पण...' लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर
Lawrence Bishnoi and salman khanImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 10:59 AM
Share

अभिनेता सलमान खानला (Salman Khan) मिळालेल्या धमकीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तुरुंगात असलेल्या गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईची (Lawrence Bishnoi) चौकशी केली. या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सलमान किंवा त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना मी कोणतंही धमकीचं पत्र पाठवलं नाही, असं लॉरेन्सने पोलिसांना सांगितलं. लॉरेन्सने याआधी 2018 मध्येही सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या धमकीची कबुलीही त्याने आता दिली. गँगचा सदस्य संपत नेहरा याच्या माध्यमातून त्यावेळी सलमानला धमकी दिली होती, मात्र आता मिळालेल्या पत्राशी माझा काहीही संबंध नाही, असं त्याने स्पष्ट केलं. सलमानला मिळालेल्या पत्रात ‘LB’ आणि ‘GB’ असं लिहिलेलं होतं. त्याचा लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारशी काहीही संबंध नाही. हे धमकीचं पत्र कुठल्या तरी दुसऱ्या गँगने किंवा पब्लिसिटी स्टंट म्हणून कोणीतरी पाठवलं असेल, असंही तो म्हणाला.

5 जून रोजी सलमान आणि सलीम खान यांना धमकीची एक चिठ्ठी मिळाली होती. ‘तुझा सिद्धू मूसेवाला करू’ असं त्यात लिहिलं होतं. त्यानंतर राज्य सरकारच्या गृह खात्याने त्यांची सुरक्षा वाढवून त्यासंदर्भात अधिक तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने या हत्येची कबुली दिली होती.

हेच ते धमकीचं पत्र-

Salman Khan News

धमकी प्रकरणी सलमानचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलंय. “या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. आम्ही सलमान खानला मिळालेल्या पत्राची आणि या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहोत. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. मात्र आणखी गरज पडल्यास आम्ही सलमानची सुरक्षा वाढवण्याच्या तयारीत आहोत,” असं ते म्हणाले.

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने दहशत माजवली आहे. तो सध्या तुरुंगात असला तरी तिथूनच तो दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी विश्वातील आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. लॉरेन्स हा पंजाबच्या फजिल्ला इथल्या अबोहर भागात राहणारा आहे. 2018 मध्ये त्याने जेव्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली, तेव्हा तो देशभरात चर्चेत आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या गँगशी संबंधित काही शूटरला अटक केली होती. लॉरेन्स कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या निवडणुकीत सहभागी झाला होता. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याने विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्याच्या गुन्हेगारीला सुरुवात झाली. त्याच्याविरोधात 50 पेक्षा जास्त लोकांच्या हत्येचा आणि हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.