गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जिल्ह्यात घरोघरी दारुनिर्मिती, पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातच काही भागांमध्ये घराघरात गावठी दारुनिर्मिती केली जात असल्याची माहिती समोर आली आहे (liquor production in Maharashtra Home Ministers Nagpur City).

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जिल्ह्यात घरोघरी दारुनिर्मिती, पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जिल्ह्यात घरोघरी दारुनिर्मिती, पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातच काही भागांमध्ये घराघरात गावठी दारुनिर्मिती केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात लॉकडाऊन काळात गावठी दारुविक्रेत्यांनी नियम मोडून मद्यप्रेमींची तहान भागवल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली. संबंधित भागात पोलीस गेले तर ते देखील आवाक झाले. त्या भागात एक-दोन घर सोडून घरोघरी गावठी दारुची निर्मिती केली जात होती. आता याप्रकरणी नेमकी काय कारवाई होते? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल (liquor production in Maharashtra Home Ministers Nagpur City).

नेमकं प्रकरण काय?

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात भयानक प्रकार समोर आला आहे. कोरोना रुग्णांची वाढता संख्या लक्षात घेता प्रशासनाने नागपुरात 15 मार्च ते 21 मार्च लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, या काळात नियमांचं उल्लंघन करुन गावठी दारु विकली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याच लॉकडाऊन काळात मध्यप्रेमींची तलफ भागविण्यासाठी गावठी दारू विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गावठी दारू विक्री सुरू केली होती. अखेर याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी बराच साठा नेस्ताबूत केला तर काही साठा जप्त केला.

नागपुरातील ‘तो’ परिसर नेमका कुठला?

नागपूर शहरातील अजनी पोलीस स्टेशन हद्दीतल्या डोरली, रामटेके नगर भागात घरातच मोहफुलातून गावठी दारू बनवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अजनी पोलिसांनी या भागात उत्पादन शुल्क विभागाच्या साथीने धाड सत्र सुरू केलं. यात 8 ते 10 ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनविले जात असल्याचे पुढे आले. हे गावठी दारूचे अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले. पोलिसांनी जवळपास 4 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

परिसरात 2 घर सोडून प्रत्येक घरात दारु बनविली जाते

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या परिसरात 2 घर सोडून प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात दारू काढून विक्री केल्या जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नागपुरात अवैधपणे गावठी दारूचा महापूर आल्याचे या प्रकारावरून दिसून येते. त्यामुळे पोलिसांपुढे येत्या काळात अशा दारू विक्रेत्याच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान आहे (liquor production in Maharashtra Home Ministers Nagpur City).

हेही वाचा : केसांना हात लावला अन् सोनं पडायला लागलं, जाणून घ्या नेमका प्रकार काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI