AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमासाठी वाट्टेल ते ! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते,त्याने थेट 14…

प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो, वाट्टेल ते करण्याची तयारी असते. चंद्र-तारे तोडून आणण्याची भाषाही प्रेमवीर करत असतात. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये तर प्रेमवीरांनी जो कारनामा केला ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. त्यांनी चक्क

प्रेमासाठी वाट्टेल ते ! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते,त्याने थेट 14...
प्रेमवीरांचा कारनामा Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 26, 2025 | 10:25 AM
Share

प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो, वाट्टेल ते करण्याची तयारी असते. चंद्र-तारे तोडून आणण्याची भाषाही प्रेमवीर करत असतात. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये तर प्रेमवीर चक्क चोर बनले. हो, हे खरं आहे. एका प्रेमवीराने त्याच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी आणि शॉपिंग करून देण्यासाठी पैसे नसल्याने दोघांनी 1-2 नव्हे तब्बल 14 बाईक्स चोरल्या. तर दुसरीकडे पत्नीच्या विरहामुळे दु:खी झालेल्या एकाने 15 बाईक्स पळवल्या. सिडको पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीच्या बाईक्सही जप्त केल्या आहेत. या अनोख्या बाईक चोरीमुळे शहरातील नागरिकांचं मात्र धाबं दणाणलं आहे.पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बायको गेली माहेरी, पती बनला चोर

मिळालेल्य माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी 29 चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या. पत्नी सोडून माहेरी गेलेल्या विरहात पती दु:खी झाला, आणि सिरपची नशा लागली. मात्र नशा करण्यासाठी पैसे नसल्याने एका आरोपीने चक्क 15 बाईक्स चोरल्या. त्या पैशांचा गैरवापर तो करत होता. दुचाकी चोरणाऱ्या एका आरोपीला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतलं. एवढंच नव्हे तर चोरी केलेल्या पंधरा दुचाकीदेखील त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. मोहम्मद हमीद अहमद सिद्दिकी असं या आरोपीचे नाव असून त्याने शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून या दुचाकी चोरल्या होत्या.

लव्ह मॅरेज करायचं, गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी चोरल्या बाईक्स

तर दुसरीकडे प्रेम विवाह करायचा आहे. मात्र प्रेयसीला भेटवस्तू आणि शॉपिंग करण्यासाठी पैसे नसल्याने दुचाकी चोरणाऱ्या 2 प्रेमवीरांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त केल्या. अजय विजय वाकडे आणि कैफ रफिक शेख अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही बिडकीन मधून दुचाकी चोरायचे आणि शहरात आणून अगदी स्वस्त भावात 5 ते 7 हजार रुपयात दुचाकीची विक्री करायचे अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलिस आणि गुन्हे शाखा करत आहे. मात्र या अनोख्या बाईक चोरांमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन