Bhaiyyu Maharaj | मांत्रिकाशी 25 लाखांची डील, भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या युवतीचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट, पियुष जिजू कोण?

भय्यू महाराजांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पलकला आधीच अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त करत डीलीट केलेल्या चॅटिंग डेटा रिकव्हर केला आहे

Bhaiyyu Maharaj | मांत्रिकाशी 25 लाखांची डील, भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या युवतीचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट, पियुष जिजू कोण?
पलक पुराणिक, भय्यू महाराज
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 3:41 PM

मुंबई : दिवंगत आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्या प्रकरणात दर काही दिवसांनी नवनवे ट्विस्ट येताना दिसतात. नुकतेच भोपाळच्या फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी तब्बल 109 पानी व्हॉट्सअ‍ॅप चॅट रिकव्हर करुन कोर्टात सादर केले. यामध्ये भय्यू महाराजांसाठी BM असा कोडवर्ड वापरण्यात आला आहे. महाराजांना ब्लॅकमेल करणारी पलक पुराणिक (Palak Puranik) ‘पियुष जिजू’ नावाच्या व्यक्तीसोबत चॅटिंग करत असल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

भय्यू महाराजांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पलकला आधीच अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त करत डीलीट केलेल्या चॅटिंग डेटा रिकव्हर केला आहे. “BM ला वेडसर करुन घरात बसवण्याचे प्रयत्न करण्यात आले. एका मांत्रिकासोबत यासाठी 25 लाख रुपयांची डील झाली होती” असे या चॅटिंगमध्ये दिसते. भय्यू महाराजांची कन्या कुहू आणि दुसरी पत्नी आयुषी यांचाही उल्लेख चॅटमध्ये आहे.

पलकच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काय सापडलं?

पलक : भैय्या, आयुषीला चांगला मांत्रिक सापडला आहे. 25 लाखांत डील झाली आहे. पियुष जिजू : कोणासोबत? पलक : मांत्रिकासोबत… पलक : BM ला वेडा करुन घरी बसवलंय. पियुष जिजू : कुहू घरी येणार आहे. उद्या तिची रुम ठीक होईल. पलक : कुहूने शरदला सांगितलं, की मी समोर आले तर ती मला मारुन टाकेल पलक : कुहू सगळ्या तयारीनिशी आलेली दिसतेय. पियुष जिजू : कुठे? इंदौरला का? पलक : आयुषीने पुन्हा काम बिघडवलं. पलक : तिने पुन्हा वहिनी, कुहू आणि बापूंचे फोटो जाळले.

तीन वर्षांपूर्वी भय्यू महाराजांची आत्महत्या

भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी आई कुमुदिनी जबाब नोंदवणार होत्या. मात्र हा खटला दीर्घ काळापासून प्रलंबित राहिला. दरम्यानच्या काळात (मे 2021 मध्ये) कुमुदिनी यांचेही निधन झाले.

भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करुन लग्नासाठी दबाव आणणारी युवती पलक हिला दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. तर महाराजांचे सेवक विनायक आणि ड्रायव्हर शरद हे दोघेही त्या तरुणीला या कामात मदत करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भय्यू महाराजांची दुसरी पत्नी आयुषी आणि त्यांच्या अन्य नातेवाईकांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला होता.

भय्यू महाराजांनी आयुषीसोबत 17 एप्रिल 2017 रोजी दुसरा विवाह केला होता. पलकने भय्यू महाराजांचे अश्लील व्हिडीओ शूट करत त्यांना लग्न करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या

भय्यू महाराजांच्या विश्वासू सेवकाला बेड्या, विनायक कसा सापडला?  

भय्यूजी महाराजांना अश्लील सीडीने ब्लॅकमेल करणारी ‘ती’ कोण?  

भय्यू महाराजांच्या मातोश्रींचे निधन, अंत्यसंस्कारावरुन दुसरी पत्नी आणि मुलीत वाद

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.