हॉटेलमध्ये नवरा-बायको म्हणून मुक्काम, बॉयफ्रेण्डकडून चारित्र्यावर संशय, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

| Updated on: Sep 14, 2021 | 3:30 PM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरवयीन मुलगी आणि मुलाने एक विवाहित जोडपे म्हणून तिथे चेक इन केले होते. हॉटेल व्यवस्थापनाला त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवले होते.

हॉटेलमध्ये नवरा-बायको म्हणून मुक्काम, बॉयफ्रेण्डकडून चारित्र्यावर संशय, अल्पवयीन मुलीची आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

भोपाळ : एका अल्पवयीन मुलीने हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. संबंधित अल्पवयीन तरुणी तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत तिथे मुक्कामाला आली होती. मात्र त्याने तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केल्यानंतर दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. त्यानंतर तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

संबंधित अल्पवयीन मुलीने तिच्या अल्पवयीन प्रियकरासह सोमवारी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये चेक-इन केले होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरवयीन मुलगी आणि मुलाने एक विवाहित जोडपे म्हणून तिथे चेक इन केले होते. हॉटेल व्यवस्थापनाला त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवले होते.

मित्राला भेटायला बोलावलं

प्रियकराने आपल्या एका मित्राला, जो अल्पवयीनच आहे, भेटायला बोलावले होते. हा मित्र सोमवारी हॉटेलमध्ये दोघांना भेटायला गेला. त्यावेळी प्रेमी युगुलामध्ये चारित्र्याच्या संशयातून वादावादी झाली आणि मुलीने प्रियकराच्या त्या मित्रासमोरच खिडकीतून उडी मारली.

नेमकं काय घडलं?

“प्रेयसी आपल्या मित्रासोबतही रिलेशनशपीमध्ये असून ती आपल्याला फसवत आहे, असा संशय प्रियकराला होता. म्हणूनच त्याने आपल्या मित्रालाही सोमवारी हॉटेलमध्ये भेटायला बोलावले होते. त्या मित्राच्या उपस्थितीतच त्याने प्रेयसीला वारंवार प्रतारणेविषयी टोकलं आणि तिला अनेकदा थप्पडही लगावली, त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचललं. मित्र आणि प्रियकराच्या समोरच तिने हॉटेलच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली” असं पोलिसांनी सांगितलं.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलगा आणि हॉटेल व्यवस्थापकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलांना मॅनेजरने हॉटेलमध्ये प्रवेश दिला होता. पोलिसांनी पुढे म्हटले आहे की, सोमवारी हॉटेलला भेट दिलेल्या अन्य अल्पवयीन मुलाचा यात सहभाग असल्याचे दिसत नाही.

प्रत्यक्षदर्शींशी बोलल्यानंतर पोलिसांनी दावा केला की जेव्हा ही घटना घडली तेव्हा हॉटेलमध्ये बरेच लोक थांबले होते. “अनेकांनी तरुणांना भांडताना पाहिले किंवा ऐकले. त्यांचे जबाबही नोंदवले गेले आहेत” असे पोलिसांनी सांगितले.

मुलांच्या पालकांना कल्पनाही नव्हती

दोन्ही अल्पवयीन मुलांच्या पालकांना त्यांनी हॉटेलमध्ये चेक इन केल्यापासून त्यांच्या ठावठिकाणाबद्दल माहिती नव्हती, असा दावा पोलिसांनी केला. दोघांपैकी एकाच्या पालकाने आपला पाल्य बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केलेली नाही. सध्या मुलीचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तर अल्पवयीन प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

अल्पवयीन तरुणाची आत्महत्या, कुटुंबियांनी मृतदेहासोबत प्रेयसीचं लगीन लावलं

धक्कादायक! अल्पवयीन मुलीशी बळजबरी, मुलगी 7 महिन्यांची गर्भवती; बदनामीच्या भीतीनं आत्महत्या

विवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास