AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन तरुणाची आत्महत्या, कुटुंबियांनी मृतदेहासोबत प्रेयसीचं लगीन लावलं

एका तरुणाला प्रेयसीच्या आईने लग्नाला नकार दिला. याच मुद्द्यावरुन त्याचा प्रेयसीसोबत वाद झाला. याच वादातून तरुणाने नैराश्यात जावून गळफास घेऊन आत्महत्या केली (People forcibly married their girlfriend to the body of the deceased)

अल्पवयीन तरुणाची आत्महत्या, कुटुंबियांनी मृतदेहासोबत प्रेयसीचं लगीन लावलं
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 31, 2021 | 2:47 PM
Share

कोलकाता : एका तरुणाला प्रेयसीच्या आईने लग्नाला नकार दिला. याच मुद्द्यावरुन त्याचा प्रेयसीसोबत वाद झाला. याच वादातून तरुणाने नैराश्यात जावून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा तरुणाच्या कुटुंबियांना प्रचंड राग आला. त्यांनी मृतकाच्या प्रेयसीला आणि तिच्या आईला घरातून उचललं. त्यानंतर मुलीचं मृतकाच्या मृतदेहासोबत लग्न लावलं. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा आहे (People forcibly married their girlfriend to the body of the deceased).

मुलीच्या आईचा लग्नाला नकार का?

संबंधित घटना ही पश्चिम बंगालच्या बर्दवान येथे घडली आहे. मुलगा आणि मुलगी दोघं वेगवेगळ्या धर्माचे होते. मात्र, तरीही दोघांचे कुटुंबिय त्यांच्या लग्नासाठी तयार होते. मात्र, प्रेमी युगुल अल्पवयीन होतं. त्यामुळे मुलीच्या आईला लगेच लग्न करण्यावर आक्षेप होता. हाच मुद्दा मुलीने तिच्या प्रियकराला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. यातूनच त्यांचा वाद झाला (People forcibly married their girlfriend to the body of the deceased).

आत्महत्या करण्याआधी प्रेयसीसोबत बातचित

मुलाने हा वाद जास्त मनाशी लावून घेतला. मुलाने प्रेयसीला लग्न नाही केलं तर आत्महत्या करेन, असा इशारा दिला. मात्र, मुलीने त्याकडे दुर्लक्ष केलं. आत्महत्या करण्याआधी मुलाने मुलीशी फोनवर बातचित केली. त्यानंतर त्याने आत्महत्या करत असतानाचे काही फोटो प्रेयसीला व्हाट्सअॅपवर पाठवले. त्यानंतर त्याने आत्महत्या केली.

मुलगी आणि तिच्या आईला मारहाण

या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी त्याच्या प्रेयसीला आणि तिच्या आईला दोषी ठरवलं. याशिवाय त्यांनी मुलीला आणि तिच्या आईला मारहाण देखील केली. त्यांना जबरदस्ती त्यांच्या घरातून मृतकाच्या घरी आणण्यात आलं. मुलगा आत्महत्या करणार हे मुलीला माहिती होतं. मुलीकडे मुलाच्या आईचा फोन नंबर होता. तिने आईला फोन केला असता तर त्याचा जीव वाचवता आला असता, अशी प्रतिक्रिया मृतकाच्या शेजारच्यांनी दिली आहे.

दरम्यान, मृतकाच्या आत्महत्येनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र, त्यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी मोठा गोंधळ घातला. मृतकाच्या प्रेयसीला तिच्या राहत्या घरुन उचलून मृतकाच्या घरी आणलं. तिथे त्यांनी जबरदस्ती मुलीचं लग्न मृत शरीरासोबत लावलं.

हेही वाचा : मोबाईलवर खेळू नकोस, बाबा ओरडल्याचा राग, मुलाकडून बँक अधिकारी वडिलांची कुऱ्हाडीने हत्या

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.