धक्कादायक! अल्पवयीन मुलीशी बळजबरी, मुलगी 7 महिन्यांची गर्भवती; बदनामीच्या भीतीनं आत्महत्या

राज्यातील महिला अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेताना नसत दिसल्याचं चित्र आहे. अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नराधमानं अल्पवयीन मुलीवर बळजबरी केली.

धक्कादायक! अल्पवयीन मुलीशी बळजबरी, मुलगी 7  महिन्यांची गर्भवती; बदनामीच्या भीतीनं आत्महत्या
प्रातिनिधिक फोटो

अमरावती: राज्यातील महिला अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेताना नसत दिसल्याचं चित्र आहे. अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नराधमानं अल्पवयीन मुलीवर बळजबरी केली. यानंतर ती मुलगी गर्भवती राहिली. अखेर 7 महिन्यांची गर्भवती असताना भीतीपोटी संबंधित मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. येवदा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणी तपास सुरु आहे.

बदनामीच्या भीतीनं आत्महत्या

अमरावती मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. पुन्हा एकदा दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. अल्पवयीन मुलीचं वय 17 वर्ष होतं. यातून अल्पवयीन 7 महिन्याची गर्भवती असताना बदनामीच्या भीती पोटी तिने स्वतः ला गळफास लावून घेतलाय.

आरोपीला अटक

मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळवल्यानंतर येवदा पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली. येवदा पोलिसांनी या नराधमास ताब्यात घेतले आहे. तर, पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक तपास येवदा पोलीस करत आहेत.

पोलिसांकडून तपास सुरु

अमरावतीच्या येवदा पोलिसांनी या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. येवदा पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

लग्नाला विरोध केल्यानं महिलेचा खून

लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईलाच संपवल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथे घडली आहे. याघटनेत मृत झालेल्या महिलेचं नाव लता परीट असं आहे. तर, आजरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातल्या आल्याचीवाडी इथं घटना धक्कादायक घटना घडली आहे. लता परीट या शेतात कामासाठी गेल्या असता तिथं त्यांचा खून करण्यात आला आहे. आजरा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्र फिरवत आरोपी गुरुप्रसाद माडभगत याला अटक केली असून तपास सुरु आहे. आजरा पोलिसांनी आरोपी गुरुप्रसाद माडभगत याच्याकडं चौकशी केली असता त्यानं परीट यांनी त्यांच्या मुलीसाठी लग्नाचा दिलेला प्रस्ताव नाकारल्याने माडभगत यांनं हल्ला केला. माडभगत यानं लता परीट यांचा खुरप्यानं हल्ला करुन खून केल्याचं समोर आलं आहे. आजरा पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

इतर बातम्या:

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या; पीडितेच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया

Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Mumbai Sakinaka Rape : मुंबईला पुन्हा हादरवणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?

Amaravati Minor Girl commit suicide due to pregnant from one person

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI