नवऱ्याने आधी बायकोच डर्टी सिक्रेट ओपन केलं, मग जे पाऊल उचललं त्याने सगळचे हळहळले
लग्नानंतर पुढची काहीवर्ष कुटुंबात सगळं काही सुरळीत सुरु होतं. मयंक आणि दीक्षा यो जोडप्याला दोन मुली झाल्या. एक मुलगी 6 वर्षांची आणि दुसरी 3 वर्षांची आहे. मयंक शर्मा या युवकाच 2017 साली शास्त्रीनगरला राहणाऱ्या 29 वर्षीय दीक्षा शर्मासोबत लग्न झालेलं.

समाजात बायकानाच नाही पुरुषांना सुद्धा छळाला सामोरं जावं लागतं. त्याचच हे प्रकरण आहे. पुरुषांना जो मानसिक त्रास दिला जातो, त्याची वाच्यता स्त्रियांच्या तुलनेत कमी होते. मयंक शर्मा या युवकाच 2017 साली शास्त्रीनगरला राहणाऱ्या 29 वर्षीय दीक्षा शर्मासोबत लग्न झालं. लग्नानंतर पुढची काहीवर्ष कुटुंबात सगळं काही सुरळीत सुरु होतं. मयंक आणि दीक्षा यो जोडप्याला दोन मुली झाल्या. एक मुलगी 6 वर्षांची आणि दुसरी 3 वर्षांची आहे. मयंकच चहाच दुकान होतं. याच मयंकने WhatsApp वर स्टेटस ठेवून आयुष्य संपवलं. स्टेटसमध्ये त्याने पत्नी, सासू, मेहुणी सासू या सर्वांवर छळ केल्याचा आरोप केला. माझ्या मृत्यूसाठी हेच लोक जबाबदार आहेत असं त्याने स्टटेस ठेवलं.
याआधी 17 एप्रिलला सुद्धा पतीने पत्नीच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यावेळी त्याचे प्राण वाचले होते. मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील हे प्रकरण आहे. पत्नी दीक्षा, संजय साहू नावाच्या युवकाबरोबर बोलायची. त्यावरुन घरात अनेकदा वाद व्हायचे. त्यामुळे पत्नी दीक्षा घर सोडून निघून गेली. त्यानंतर 15 एप्रिलला पती मयंक विरुद्ध तिलवारा पोलीस ठाण्यात घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली.
त्यावेळी कुटुंबियांच्या तत्परतेमुळे वाचलेले प्राण
पोलिसात आपल्याविरुद्ध तक्रार दाखल झालीय हे समजल्यानंतर मयंक अस्वस्थ झाला. त्यानंतर त्याने 17 एप्रिलला विष प्राशन करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांना वेळीच समजल्यामुळे त्याला रुग्णालयात नेऊन त्याचे प्राण वाचवले.
नेहमीच फोनवर कोणासोबत बोलायची?
मिळालेल्या माहितीनुसार, मयंकला हे समजलेलं की, त्याच्या पत्नीचं म्हणजे दीक्षाच दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेम प्रकरण सुरु आहे. मयंकच्या कुटुंबियांनुसार दीक्षाच नेहमीच फोनवर कोणासोबत तरी संभाषण सुरु असायचं. मयंकला या बद्दल समजलेलं. मयंक दीक्षाला ओरडला व प्रियकरासोबत बोलू नकोस असं सांगितलं. यावर नाराज होऊन दीक्षा माहेरी निघून गेली. त्यानंतर मयंकला फोन करुन घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. दोन्ही मुली मयंकसोबतच रहायच्या.
पोलिसांवर काय आरोप?
कुटुंबियांनी सांगितलं की, दीक्षा सतत मयंकला त्रास देत होती. अखेर पत्नीच्या छळाला कंटाळून मयंक शर्माने आपल्या मोबाइलवर स्टेटस ठेवलं व घरातच आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. मृतकाचा भाऊ निरंजन शर्माने आरोप केला की, घटनेनंतर घमापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही. घमापूर पोलिसांना तक्रारीचा अर्ज देण्यात आला आहे. सध्या पोलीस WhatsApp स्टेटसचा तपास करत आहेत.
