AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marry Me…महिला प्रोफेसरने कॉलेज स्टुडंटला मागणी घातली, पण यातून शेवटी नको ते घडलं

Lady Teacher Proposed Student : एका महिला शिक्षिकेचा आपल्याच विद्यार्थ्यावर जीव जडला. ती शिक्षिक विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. तिनेच विद्यार्थ्याला प्रपोज केला. प्रिया तिथे काही वर्षापासून गेस्ट टीचर म्हणून यायची.

Marry Me…महिला प्रोफेसरने कॉलेज स्टुडंटला मागणी घातली, पण यातून शेवटी नको ते घडलं
Lady Teacher Proposed Student
| Updated on: Jul 01, 2025 | 2:54 PM
Share

प्रेम ही गोष्ट कधी कोणाच्या नियंत्रणात नसते. प्रेम कधीही, कुठेही, कोणावरही होऊ शकतं. प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. खासकरुन कॉलेजला जाण्याच्या वयात प्रेमात पडणं स्वाभाविक आहे. कॉलेजमध्ये मुलं मुलींना प्रपोज करतात. काहीवेळा मुली मुलांना प्रपोज करतात. इथपर्यंत ठीक आहे. पण महिला प्रोफेसरला एखादा विद्यार्थी आवडला तर? ती त्याच्या प्रेमात पडली तर? असाच प्रकार मध्य प्रदेशच्या खंडवामध्ये घडला. एका महिला शिक्षिकेचा आपल्याच विद्यार्थ्यावर जीव जडला. ती शिक्षिक विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. तिनेच विद्यार्थ्याला प्रपोज केला.

विल यू मॅरी मी? त्यावर विद्यार्थ्याचं उत्तर ऐकून शिक्षिकेला मोठा झटका बसला. या महिला शिक्षिकेन स्वत:च आयुष्यच संपवलं. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. पुनासा चौकी क्षेत्रातील घटना आहे. आयटीआय कॉलेजमध्ये शिकवणारी 24 वर्षीय शिक्षिका प्रिया यादवला तिचाच विद्यार्थी सपन यादव आवडू लागला. ती त्याच्या प्रेमात पडली. सपन सुद्धा 24 वर्षांचा आहे. प्रियाने लग्नाची मागणी घातल्यानंतर सपनने तिला नकार दिला. यामुळे प्रियाला खूप दु:ख झालं. तिने शुक्रवारी राहत्या घरी आपलं आयुष्य संपवलं. सपन आसपासच्या लोकांच्या मदतीने प्रियाला रुग्णालयात घेऊन गेला. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

गेस्ट टीचर म्हणून यायची

पोलीस चौकशीत सपनने सांगितलं की, आयटीआय नर्मदा नगरमध्ये तो शिक्षण घेतोय. प्रिया तिथे काही वर्षापासून गेस्ट टीचर म्हणून यायची. शिकता, शिकता दोघांमध्ये प्रेम झालं. मोबाइलवर त्यांच्यात बोलणं व्हायचं. हळूहळू हे प्रेमसंबंध बहरत गेले. दोघांच मागच्या वर्षभरापासून अफेअर सुरु होतं. दोघांच्या कुटुंबियांना सुद्धा या नात्याबद्दल माहित होतं.

तेव्हा त्याला मोठा धक्का बसला

शुक्रवारी प्रियाने सपनला आपल्या घरी बोलावलं. तिथे ती त्याच्याबरोबर लग्नाच्या विषयावर बोलली. सपन तिला बोलला की, आधी मला माझ्या पायावर उभं रहायचय. नोकरी करायची आहे. त्यानंतरच लग्न करेल. हे ऐकून प्रिया नाराज झाली. तिने मोबाइल जमिनीवर आपटून तोडला. नंतर ती खोलीत निघून गेली. अर्धातास ती खोलीबाहेर आली नाही. मग सपनने घराच्या छतावर जाऊन खिडकीतून खाली पाहिलं, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. प्रियाने जीवन संपवलं होतं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.