आधी विवाहितेसोबत सेक्स, मग तिची मर्डर, मृतदेह पुरुन बॉयफ्रेंड त्याच जागेवर खाट टाकून मस्त झोपला, या नराधमाने असं का केलं?
2 ऑक्टोंबरच्या रात्री मी रोहिणीला गावात एका घरी भेटण्यासाठी बोलावलं. तिथे आम्ही शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर मी रोहिणीची गळा आवळून हत्या केली. लग्नाआधीपासून माझे प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही आम्ही लपून-छपून भेटायचो.

एका युवतीला विवाहबाह्य संबंध ठेवणं खूपच भारी पडलं. विवाहित असूनही ती पूर्व प्रियकराला भेटायची, त्याच्याशी तिचे संबंध होते. नंतर बॉयफ्रेंडने तिच्यासोबत जे केलं, ते ऐकूनच सगळेच सून्न झाले आहेत. प्रियकराने विवाहित प्रेयसीसोबत आधी शरीरसंबंध ठेवले. मग, तिची हत्या करुन मृतदेह घरातच दफन केला. ज्या ठिकाणी मृतदेह पुरला, तिथेच खाट टाकून त्यावर तो झोपला. मध्ये प्रदेशच्या निवाडी जिल्ह्यात हादरवून सोडणारी ही घटना घडली आहे.
रजपुरा गावच हे प्रकरण आहे. त्या गावात राहणारी रोहिणी राजपूत नावाची विवाहित युवती गायब झालेली. म्हणून तिच्या पतीने आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी त्यांना समजलं की, रोहिणीच रतिराम राजपूत सोबत लग्नाआधी अफेअर होतं. रोहिणी लग्नानंतरही त्याला भेटायची. संशयाच्या आधारावर पोलिसांनी रतीराम राजपूतला ताब्यात घेऊन कठोरतेने चौकशी केली. त्यावेळी आरोपीने सर्व सत्य सांगितलं. कशी त्याने रोहिणीची हत्या करुन मृतदेह घरातच दफन केला.
ती तिच्या नवऱ्याला सोडायला तयार होती
पोलिसांना रतिरामने सांगितलं की, “रोहिणी राजपूत सोबत लग्नाआधीपासून माझे प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही आम्ही लपून-छपून भेटायचो. पण मागच्या काही दिवसांपासून रोहिणी लग्नासाठी मागे लागलेली. ती तिच्या नवऱ्याला सोडायला तयार होती. पण रतीराम रोहिणीसोबत लग्नासाठी तयार नव्हता. त्याला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं“
तिथे आम्ही शरीरसंबंध ठेवले
रोहिणीच्या सततच्या मागणीला कंटाळून रतीरामने तिच्या हत्येच प्लानिंग केलं. याच दबावाखाली मी माझ्या मित्रांच्या मदतीने विवाहित प्रेयसीला मार्गातून हटवण्याचा प्लान केला. 2 ऑक्टोंबरच्या रात्री मी रोहिणीला गावात एका घरी भेटण्यासाठी बोलावलं. तिथे आम्ही शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर मी रोहिणीची गळा आवळून हत्या केली.
तिथेच खाट टाकून झोपला
आरोपी रतीरामने मित्र कालीचरण, मुकेश आणि ज्ञान सिंहसोबत मिळून घरातच खड्डा खोदला व मृतदेहाच दफन केलं. माती आणि शेणाने तो खड्डा व्यवस्थित बुजवला. त्यानंतर तिथेच खाट टाकून रतीराम आरामात दोन दिवस झोपून होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पण हैराण करणारी बाब म्हणजे आरोपी पोलीस कस्टडीत पोलिसांना चकवा देऊन पळून गेला.
आरोपी पोलीस कोठडीतून कसा पळाला?
पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलय. या सगळ्या प्रकरणात निवाडी पोलिसांची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद आहे. पोलिसांनी मागच्या काही दिवसांपासून हे प्रकरण दाबून ठेवलेलं. आरोपी पोलीस कोठडीतून पळून गेल्यानंतर नाईलाजाने पोलिसांना हे प्रकरण समोर आणावं लागलं.
