दोन वर्षांच्या चिमुरडीची हत्या, सांगलीत 26 वर्षीय जन्मदात्रीला अटक

सांगलीच्या संजय नगरमधील दडगे प्लॉटमध्ये राहणाऱ्‍या दोन वर्षांच्या बालिकेचा जन्मदात्या आईनेच गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे. 26 वर्षीय संशयित रेवती संजय लोकरे हिला अटक केली आहे.

दोन वर्षांच्या चिमुरडीची हत्या, सांगलीत 26 वर्षीय जन्मदात्रीला अटक
बालिकेच्या हत्येप्रकरणी आईला अटक

सांगली : जन्मदात्या आईनेच 2 वर्षांच्या चिमुरडीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी गतिमंद असल्याच्या कारणाने आईने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सांगलीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. 26 वर्षीय संशयित महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

सांगलीच्या संजय नगरमधील दडगे प्लॉटमध्ये राहणाऱ्‍या दोन वर्षांच्या बालिकेचा जन्मदात्या आईनेच गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे. बालिका गतिमंद असल्याने आईनेच एका हाताने गळा आणि दुसऱ्‍या हाताने तोंड दाबून तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर संजयनगर पोलिसांनी 26 वर्षीय संशयित रेवती संजय लोकरे हिला अटक केली आहे.

हत्येचं कारणही सांगितलं

दडगे प्लॉटमध्ये आई, आजी, आत्या आणि चुलत्यांसमवेत राहणाऱ्‍या ज्ञानदा संजय लोकरे (वय 2) हिचा काल दुपारी अचानक मृत्यू झाला होता. मुलीला बोलता येत नसल्याने आणि ती गतिमंद असल्याने हे कृत्य केल्याची कबुली आई रेवती लोकरेने पोलीस तपासादरम्यान दिली.

प्रियकरासोबत भांडण, मुंबईत अल्पवयीन तरुणीकडून मुलीची हत्या

दुसरीकडे, बॉयफ्रेण्ड सतत या मुलीचा बाप कोण आहे? असे विचारत असल्याने मुंबईतील वांद्रे भागात एका अल्पवयीन आईने पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना 31 ऑक्टोबर रोजी वांद्र्यात घडली होती. दोन महिन्यांनी या घटनेतील आरोपी आईला अटक करण्यात पोलिसांना यश आलं होतं. मुलीचा बाप कोण आहे, यावरुन तरुणीचे प्रियकरासोबत वारंवार खटके उडायचे. याच रागातून मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह रिक्षाच्या मागच्या सीटवर ठेऊन अल्पवयीन आरोपी पळून गेली होती.

संबंधित बातम्या :

बॉयफ्रेण्डने विचारले ही मुलगी कुणाची, आईकडून रागात एक महिन्याच्या मुलीची हत्या

नागपुरात 35 वर्षीय तरुणाची आत्महत्या, पोलिसांच्या मारहाणीमुळे जीव दिल्याचा आरोप

बाईकवर टेम्पो घालून सोलापुरात शिवसैनिकांची हत्या, पाच संशयितांना कर्नाटकातून अटक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI