AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात 35 वर्षीय तरुणाची आत्महत्या, पोलिसांच्या मारहाणीमुळे जीव दिल्याचा आरोप

नागपुरात राहणाऱ्या महेश राऊतने 100 नंबरवर फेक कॉल केला, या कारणामुळे पोलिसांनी मारहाण केली होती. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे

नागपुरात 35 वर्षीय तरुणाची आत्महत्या, पोलिसांच्या मारहाणीमुळे जीव दिल्याचा आरोप
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 12:24 PM
Share

नागपूर : नागपुरात 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. फेक कॉल केल्याबद्दल पोलिसांनी मारहाण केल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. नागपूरमधील मनोज ठवकर (Manoj Thawkar) या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

नागपुरात राहणाऱ्या महेश राऊत नावाच्या 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. काल पोलिसांनी मारहाण केल्यामुळे महेशने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. महेश राऊतने 100 नंबरवर फेक कॉल केला, या कारणामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

तरुणाचे नातेवाईक पोलीस स्टेशन परिसरात

नागपूर जिल्ह्यातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती आहे. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. महेश राऊतचे नातेवाईक हुडकेश्वर पोलीस स्टेशन परिसरात पोहोचले आहेत.

मनोज ठवकर मृत्यू प्रकरण काय आहे?

पोलिसांच्या मारहाणीत 35 वर्षीय मनोज ठवकर या नागपुरातील दिव्यांग तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. मनोज ठवकर मेकॅनिक म्हणून काम करत होता. नागपूर शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात सात जुलैच्या रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. रात्री साडेआठ-नऊ वाजताच्या सुमारास मनोज या मार्गाने घरी चालला होता. मनोजची दुचाकीही थांबवण्यात आली, मात्र वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकली.

पोलिसांच्या मारहाणीनंतर बेशुद्ध

मनोजने मुद्दाम धडक मारल्याचा पोलिसांचा समज झाला, असा दावा केला जातो. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे याच्यासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आले. मात्र शुद्ध हरपलेल्या मनोज ठवकरला नागपुरातील भवानी मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्याआधीच मृत घोषित करण्यात आलं होतं. पारडी पोलीस स्टेशन हद्दीत सात जुलैच्या रात्री ही घटना घडली होती

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आधी तिघा पोलिसांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. मास्क न घातल्यामुळे तिघा पोलिसांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, तपास सीआयडीकडे, तिघा पोलिसांची बदली

पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर मृत्यू प्रकरण, नागपुरात पोलीस उपनिरीक्षकासह तिघे कर्मचारी निलंबित

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.