AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबरनाथमध्ये चहाच्या उधारीवरुन तलवारीचे वार, एक जण जखमी, दोघांना बेड्या

चहाच्या उधारीवरुन चहावाल्याशी हुज्जत झाल्यानंतर भांडण सोडवायला (Ambernath Youth Attacked By Sword) आलेल्या व्यक्तीवरच तलवारीने वार केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.

अंबरनाथमध्ये चहाच्या उधारीवरुन तलवारीचे वार, एक जण जखमी, दोघांना बेड्या
Ambernath Sword Attack
| Updated on: Mar 10, 2021 | 8:59 AM
Share

अंबरनाथ : चहाच्या उधारीवरुन चहावाल्याशी हुज्जत झाल्यानंतर भांडण सोडवायला (Ambernath Youth Attacked By Sword) आलेल्या व्यक्तीवरच तलवारीने वार केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या भास्करनगर परिसरात ही घटना घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे (Maharashtra Crime News Ambernath Youth Attacked By Sword By Two).

नेमकं काय घडलं?

भास्कर नगरमधील कटप्पा चौकात नागोरी चहाचं दुकान आहे. या दुकानात तबरेज आणि समीर मोईद्दीन शेख हे दोघे चहा पिण्यासाठी आले होते. यावेळी चहावाला सलाम याने उधारी बंद केल्याचं सांगत त्यांना चहा द्यायला नकार दिला. त्यावरुन या दोघांनी सलाम याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

यावेळी तिथे असलेल्या समीर आसिफ मोमीन या तरुणाने भांडणं सोडवायचा प्रयत्न केला. मात्र तबरेज आणि समीर शेख यांनी तलवारीने समीर मोमीन याच्यावर तलवारीने हल्ला चढवला. या हल्ल्यात समीर मोमीनला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत तबरेज आणि समीर शेख यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त करण्यात आली आहे.

बुलडाण्यात क्षुल्लक कारणावरुन दिराकडून विधवा महिलेसह दोन मुलींना मारहाण

शेतीची वाटणी आणि इतर क्षुल्लक कारणावरून दिराने एका विधवा महिलेसह तिच्या दोन मुलींना अमानुषपणे मारहाण केल्याची धकादायक घटना घडली आहे. विधवा महिलेचा दीर म्हणजेच आरोपी प्रभाकर हावरे याने एका मुलीवर कोयत्याने वार करत तिचा कान कापला आहे. जागतिक महिला दिनाच्या दोन दिवस आधी म्हणजेच 6 मार्च रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Crime News Ambernath Youth Attacked By Sword By Two

संबंधित बातम्या :

आधी प्रेमविवाह, आठ वर्षांचा मुलगाही, तरीही भल्या पहाटे क्षुल्लक कारणावरुन पतीची निर्घृण हत्या

Batla House Encounter : पापाचा घडा भरला, आरिज खान दोषी, कोर्ट काय शिक्षा देणार?

मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह, अहमदनगरमध्ये भाजप तालुकाध्यक्षाचा जावयावर हल्ला

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.