Batla House Encounter : पापाचा घडा भरला, आरिज खान दोषी, कोर्ट काय शिक्षा देणार?

Batla House Encounter : पापाचा घडा भरला, आरिज खान दोषी, कोर्ट काय शिक्षा देणार?

बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणी दिल्ली कोर्टात आरोपी आरिज खान दोषी असल्याचं सिद्ध झालं (Delhi court convicted ariz khan in batla house encounter case).

चेतन पाटील

|

Mar 08, 2021 | 4:15 PM

नवी दिल्ली : बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणी दिल्लीच्या साकेत कोर्टात आज (8 मार्च) महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. कोर्टात आरोपी आरिज खान याच्याविरोधात सक्षम पुरावे सादर झाले. त्यामुळे तो या प्रकरणात दोषी असल्याचं सिद्ध झालं. विशेष म्हणजे जवळपास 13 वर्षांनंतर इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी आरिज खान हा दोषी असल्याचं कोर्टात सिद्ध झालं. दिल्लीत 13 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या सिरिअल बॉम्ब ब्लॉस्टमध्ये आरिज खान याचादेखील हात होता. त्यानंतर दिल्लीच्या बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीत पोलीस अधिकारी शहीद झाले होते. या घटनेवेळी आरिज तिथे उपस्थित होता, हे देखील कोर्टात सिद्ध झालं (Delhi court convicted ariz khan in batla house encounter case).

15 मार्च रोजी शिक्षा घोषित होणार

साकेत कोर्टाचे न्यायाधीश संदीप यादव यांच्यासमोर आज आरिज खानला सादर करण्यात आलं. “आरिज 19 सप्टेंबर 2008 रोजी आपल्या सहकाऱ्यांसोबत बाटला हाऊस येथे उपस्थित होता. त्यावेळी इन्सपेक्टर मोहन चंद शर्मा आणि हेड कॉन्स्टेबल बलवंत यांच्यावर जाणीवपूर्वक गोळ्या झाडल्या गेल्या. त्यामुळे आरिजला हत्येचा दोषी मानलं जात आहे. त्याला 15 मार्च रोजी शिक्षा सुणावण्यात येईल”, असा निकाल न्यायाधीशांनी घोषित केला. त्यामुळे आरिजला नेमकी काय शिक्षा घोषित होणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

न्यायाधीशांच्या अधिकाऱ्यांना सूचना

तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना न्यायाधीशांनी महत्त्वाची सूचना दिली. बाटला हाऊस एन्काउंटमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबावर किती परिणाम पडला, त्यांनी किती रुपये नुकसान भरपाई दिली जावी, आरिज त्यांना किती रुपये देऊ शकतो, यासंबंधित रिपोर्ट तयार करण्याचा आदेश न्यायाधीशांनी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला.

नेमकं प्रकरण काय?

13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीतील अनेक भागांमध्ये सिरियल बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात 26 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. तर 133 नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यामागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला 19 सप्टेंबर 2008 रोजी या हल्ल्याच्या कट रचणाऱ्या अतिरेक्यांसंबंधित महत्त्वाची माहिती मिळाली.

इंडियन मजाहिद्दीनचे 5 अतिरेकी दिल्लीतील बाटला हाऊस येथील बिल्डिंग L-18 च्या फ्लॅटमध्ये लपून बसले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या पाच अतिरेक्यांमध्ये आरिज खान, आतिफ अमीन, मोहम्मद साजिद, मोहम्मद सैफ आणि शहजाद अहमद यांचा समावेश होता. 13 सप्टेंबर 2008 रोजी इन्सपेक्टर मोहन चंद शर्मा जेव्हा आपली टीमला घेऊन बाटला हाऊसला पोहोचले तेव्हा पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत मोहन चंद शर्मा शहीद झाले. मोहन चंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी कोर्टाने याआधी शहजाद अहमदला दोषी घोषित करण्यात आलं आहे.

हेही वाचा : Maharashtra Budget 2021 : मद्यावरील व्हॅटमध्ये 5 टक्क्यांनी वाढ, काय महाग काय स्वस्त?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें