घरगुती वादातून अघोरी कृत्य, विधवा महिलेसह मुलींना मारहाण, एकीचा कान कापला

घरगुती वादातून अघोरी कृत्य, विधवा महिलेसह मुलींना मारहाण, एकीचा कान कापला
महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली.

बुलडाणा : शेतीची वाटणी आणि इतर क्षुल्लक कारणावरून दिराने एका विधवा महिलेसह तिच्या दोन मुलींना अमानुषपणे मारहाण केल्याची धकादायक घटना घडली आहे. विधवा महिलेचा दीर म्हणजेच आरोपी प्रभाकर हावरे याने एका मुलीवर कोयत्याने वार करत तिचा कान कापला आहे. जागतिक महिला दिनाच्या दोन दिवस आधी म्हणजेच 6 मार्च रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छोट्यामोठ्या कारणांवरुन भांडण

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सवणा येथे विधवा महिला तिच्या दोन मुलींसोबत राहते. शेतात मजुरी करुन ही महिला तिचा उदर्निर्वाह करते. 2015 साली या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. तेव्हापासून या महिलेचा दीर म्हणजेच आरोपी प्रभाकर हावरे महिलेसोबत छोट्यामोठ्या कारणांवरुन भांडण काढतो, असा आरोप महिलेने केला.

हल्ला केला आणि मुलीचा डावा कान कापला

तसेच, 6 मार्च रोजी रात्रीला घरा शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत बोलत असताना आरोपी प्रभाकर हावरे हा हातात कोयता घेऊन आला. कोणतेही कारण नसताना आरोपीने मुलगी आणि विवाहित महिलेला मारहाण सुरु केली. या मारहाणीमध्ये मुलीचा डावा कान कोयत्याने कापला गेला. जखम झाल्यामुळे कानातून रक्त निघत असताना तिला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असताना विधवा महिलेच्या हातालासुद्धा जखम झाली.

खून करण्याची आरोपीकडून धमकी

यावेळी दुसरी मुलगी भांडण सोडविण्यासाठी आली असता आरोपी प्रभाकर हावरे त्याने तिच्यासुद्धा कानावर कोयता मारून जखमी केले. आरोपीने या आधीसुद्धा शेतीची वाटणी आणि पेरणीच्या कारणावरून अशाच प्रकारची मारहाण केल्याचा आरोप विधवा महिलेने केला आहे. मात्र, त्यावेळी गावातील लोकांनी भांडण आपसात मिटवल्याने पोलिसात तक्रार करण्याची गरज पडली नाही, असं या महिलेने सांगितले.

दरम्यान, आरोपी प्रभाकर हावरे हा नेहमी शिवीगाळ करतो, जीवे मारून टाकण्याची तसेच खून करण्याची धकमीसुद्ध देतो असा आरोपही या महिलेने केला. या प्रकरणी चिखली पोलीस तपास करत असून एका मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

इतर बातम्या :

आधी प्रेमविवाह, आठ वर्षांचा मुलगाही, तरीही भल्या पहाटे क्षुल्लक कारणावरुन पतीची निर्घृण हत्या

Batla House Encounter : पापाचा घडा भरला, आरिज खान दोषी, कोर्ट काय शिक्षा देणार?

मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह, अहमदनगरमध्ये भाजप तालुकाध्यक्षाचा जावयावर हल्ला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI