Aurangabad Murder | मित्राच्या बर्थडेसाठी निघालेल्या 22 वर्षीय तरुणाचा गळा चिरुन खून, औरंगाबादेत खळबळ

| Updated on: Dec 17, 2021 | 9:26 AM

या खूनाच्या घटनेमुळे पोलिस दल पुरते हादरुन गेले आहे. बेगमपुरा, गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. मात्र, घटनेचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

Aurangabad Murder | मित्राच्या बर्थडेसाठी निघालेल्या 22 वर्षीय तरुणाचा गळा चिरुन खून, औरंगाबादेत खळबळ
औरंगाबादमध्ये तरुणाची हत्या
Follow us on

औरंगाबाद : उच्चशिक्षित तरुणाचा गळा चिरुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Aurangabad Murder) आला आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास औरंगाबादमधील हिमायत बागेत ही घटना घडली आहे. कृष्णा शेषराव जाधव असं मयत 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो हडको परिसरातील टीव्ही सेंटर भागात सुभाषचंद्र बोस नगरमध्ये राहत होता.

काय आहे प्रकरण?

कृष्णाच्या वडिलांचे टीव्ही सेंटर भागात बालाजी ऑप्टिकल नावाचे दुकान आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दहा ते पंधरा मिनिटांसाठी जातो, असे सांगत कृष्णा बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दुकानातून बाहेर पडला. त्यापूर्वी दुपारी कृष्णाचा मोबाईल हरवला होता. त्यामुळे तो बहिणीचा आयफोन घेऊन घराबाहेर पडला.

रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही

एमजीएम रुग्णालयाजवळील एका हॉटेलजवळ गेलेला कृष्णा तिथून थेट हिमायतबागेत आला. यावेळी त्याचा एक मित्र देखील सोबत होता. रात्री उशिरापर्यंत कृष्णा घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी त्याच्याजवळील आयफोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन कोणीही उचलत नव्हते.

फोन स्वीच ऑफ, शोध नाही

काही वेळाने कृष्णाचा फोन स्वीच ऑफ झाला. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत प्रयत्न केल्यानंतर जाधव कुटुंबियांनी सिडको पोलिस ठाणे गाठले. कृष्णा बेपत्ता झाल्याची त्यांची सिडको पोलिसात मध्यरात्री अडीचच्या सुमारास देण्यात आली. रात्रभर जाधव कुटुंबिय कृष्णाचा शोध घेत होते.

सकाळी मृतदेह सापडला

कृष्णाची बहीण त्याचा शोध घेत हिमायतबागेच्या दिशेने निघाली. सकाळी साडेदहाला कृष्णाचा मृतदेह मिळाल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. कृष्णाचा मृतदेह नेईपर्यंत कुटुंबिय घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्यासमोर पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेने घाटीत नेला

या खूनाच्या घटनेमुळे पोलिस दल पुरते हादरुन गेले आहे. बेगमपुरा, गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. मात्र, घटनेचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

संबंधित बातम्या :

सख्या मावस भावंडांचं एकमेकांवर जडलं प्रेम, कुटुंबीयांचा लग्नास नकार; प्रेमी युगुलांनी संपवली जीवनयात्रा

उल्हासनगरात घरकाम करणाऱ्या महिलेनंच केलं घर साफ, तब्बल 91 तोळे सोनं चोरून महिलेचा पोबारा

विवाहित प्रेयसीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होता तरुण, महिलेच्या पतीपासून लपताना पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू