दारासमोर भीक मागितल्याने राग अनावर, भिक्षुकाची निर्घृण हत्या, मृतदेह गटाराजवळ फेकला

. गावातीलच काळू गणपत पावरा याच्या घराबाहेर उभे राहून चैन्या पावरा याने भीक मागितली. दारासमोर उभे राहून भीक मागितल्याचा राग अनावर झाल्याने कालू पावरा या नराधमाने भिक्षुकी चैन्या पावराला दंडुक्याने डोक्यात आणि शरीरावर इतरत्र जोरदार मारहाण केली.

दारासमोर भीक मागितल्याने राग अनावर, भिक्षुकाची निर्घृण हत्या, मृतदेह गटाराजवळ फेकला
धुळे पोलीस

धुळे : भिक्षुकाने दारात उभे राहून भिक्षा मागितल्याचा राग अनावर न झाल्याने गावातीलच तरुणाने त्याची निर्घृण हत्या केली. काळू पावरा या नराधमाने डोक्यात आणि शरीरावर इतरत्र दंडुक्याच्या सहाय्याने जबर मारहाण करुन भिक्षुकाचा जीव घेतल्याची खळबळजनक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथे घडली आहे.

काय आहे प्रकरण?

शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील अमरीश नगर येथे चैन्या पावरा (वय 55 वर्ष) हा अविवाहित भिक्षुक गावामध्ये दिवसभर भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होता. गावातीलच काळू गणपत पावरा याच्या घराबाहेर उभे राहून चैन्या पावरा याने भीक मागितली. दारासमोर उभे राहून भीक मागितल्याचा राग अनावर झाल्याने कालू पावरा या नराधमाने भिक्षुकी चैन्या पावराला दंडुक्याने डोक्यात आणि शरीरावर इतरत्र जोरदार मारहाण केली.

रक्तबंबाळ अवस्थेत गटाराजवळ फेकलं

यामध्ये चैन्या पावरा मोठ्या प्रमाणात जखमी होऊन रक्तबंबाळ होत जमिनीवरती कोसळला. काळू पावरा याने तिथून उचलून भिक्षुकास दूरवर असलेल्या गटाराच्या जवळ टाकून दिले आणि तेथून पोबारा केला. परंतु गावातीलच काही व्यक्तींनी चैन्या पावरा हा जखमी अवस्थेमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मध्ये पडलेला असल्याचे बघून त्याच्या घरच्यांना या घटनेची माहिती दिली.

त्यानंतर भिक्षुक चैन्या पावरा याच्या मोठ्या भावाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळी चैन्या पावर याला रक्ताच्या थारोळ्यात बघितल्यानंतर तात्काळ पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना याची माहिती देत पोलिसांना कळवले. पोलिसांनी चैन्या पावरा यास शासकीय रुग्णालयमध्ये दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी भिक्षुक चैन्या पावरा यास मृत घोषित केले.

आरोपीला अटक

पोलिसांनी घटनेची पूर्ण माहिती घेतल्यानंतर चैन्या पावरा यास मारहाण करणाऱ्या काळू पावरा याला तात्काळ अटक केली असून पुढील तपास थाळनेर पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

नागपुरात सैन्यातील जवानाकडे सोन्याचं बिस्कीट सापडलं, धड उत्तर देईना, मग RPF जवानांनी…

बॉयलरची सफाई करताना हलगर्जी, पुण्यात उकळतं पाणी पडून चौघे भाजले, एकाचा मृत्यू

ट्रॅक्टर-कारची भीषण धडक, दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Published On - 10:30 am, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI