रेल्वेत नोकरीच्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा, आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्याचे उद्योग

रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा (Fraud Of Youth For Railway Jobs ) घालण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथ पोलिसांनी उघड केला आहे.

रेल्वेत नोकरीच्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा, आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्याचे उद्योग
Railway Job Fraud
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 12:01 PM

अंबरनाथ : रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा (Fraud Of Youth For Railway Jobs ) घालण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथ पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी आयआरसीटीसीच्या (IRCTC) एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत (Maharashtra Crime News Fraud Of Youth For Railway Jobs By IRCTC Workers).

अशी केली फसवणूक

बदलापूरला राहणाऱ्या कुमार चव्हाण या तरुणाला अशाचप्रकारे तब्बल 5 लाख रुपयांचा चुना लावण्यात आला. कुमार चव्हाण हा नोकरीच्या शोधात असतानाच त्याला कैलास राजपाल सिंग या भामट्याने रेल्वेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. कैलास आयआरसीटीसीच्या चर्चगेट स्टेशनवरील कँटीनमध्ये काम करत होता.

खोटी परीक्षा, खोटी मुलाखत

खोटी परीक्षा, खोटी मुलाखत घेऊन पास होण्यासाठी 5 लाख रुपये त्याने कुमार चव्हाण याच्याकडून उकळले. आपली अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचं सांगून त्याने त्याला खोटं नियुक्तीपत्रही दिलं. मात्र, हा सगळा प्रकार खोटा असून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कुमार याने पोलिसात धाव घेतली.

विरारहून अंबरनाथ पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

कैलास सिंग हा त्यावेळी अंबरनाथला राहात असल्यानं याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी कैलास राजपाल सिंग याला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. कारण तो दर एक ते दोन महिन्यांनी राहण्याचा ठावठिकाणा बदलत होता.

अखेरीस विरारहून त्याच्या मुसक्या आवळण्यात अंबरनाथ पोलिसांना यश आलं. यानंतर या संपूर्ण प्रकरणात रेल्वेचे दोन अधिकारी सुद्धा सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांना त्या दोन अधिकाऱ्यांचा शोध

कैलास सिंग हा या अधिकाऱ्यांना नवी गिऱ्हाईकं शोधून द्यायचा, तर हे अधिकारी बनावट लेटरहेड आणि शिक्के वापरुन फसवणूक करायचे, असं समोर आलं. त्यामुळे पोलीस आता या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा शोध घेतायत. अशाच पद्धतीनं या त्रिकुटाने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

Maharashtra Crime News Fraud Of Youth For Railway Jobs By IRCTC Workers

संबंधित बातम्या :

अंबरनाथमध्ये चहाच्या उधारीवरुन तलवारीचे वार, एक जण जखमी, दोघांना बेड्या

चॉपरने मारहाण करुन लुटायचे, वांद्रे आणि खार पोलिसांकडून तिघांना अटक

गोव्यातील 50 लाखांचं मद्य निरेत पकडलं, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.