चिमुकल्याचा गळा दाबून खून, मृतदेह पुरला, मूल नसल्याच्या नैराश्यातून हत्येचा संशय

मूळ सोनाळी गाव रहिवासी असलेला चिमुरडा सावर्डे गावात आपल्या मामाकडे राहायला आला होता. त्यावेळी त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरल्याचं समोर आलं आहे.

चिमुकल्याचा गळा दाबून खून, मृतदेह पुरला, मूल नसल्याच्या नैराश्यातून हत्येचा संशय
कोल्हापुरात चिमुकल्याची हत्या करुन मृतदेह पुरला

कोल्हापूर : सात वर्षांच्या चिमुरड्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर त्याचा मृतदेह दफन करण्यात आला होता. मूल नसल्याच्या नैराश्यातून हे टोकाचं पाऊल उचललं गेल्याचा संशय आहे. कोल्हापुरात हा प्रकार घडला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

नेमकं काय घडलं?

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सावर्डे गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. सात वर्षांचा वैभव (नाव बदलले आहे) गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. मूळ सोनाळी गाव रहिवासी असलेला वैभव हा सावर्डे गावात आपल्या मामाकडे राहायला आला होता. त्यावेळी त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरल्याचं समोर आलं आहे.

मूल नसल्याच्या नैराश्यातून हत्येचा संशय

ओळखीतील व्यक्तीनेच वैभवचा खून केल्याचा संशय वर्तवला जात आहे. मूल नसल्याच्या नैराश्यातून संशयिताने कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेमुळे वैभवच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका

दरम्यान, आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. मुरगुड पोलिसांकडून हत्या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. वैभवच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

हरियाणात मुलाची हत्या करुन घरात पुरलं

दरम्यान, धाकट्या मुलाच्या मदतीने सख्ख्या आईनेच आपल्या मोठ्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. मुलाचा मृतदेह आरोपी मायलेकांनी घरातच पुरला होता. मात्र घरातील एकाच खोलीत नवीन टाईल्स पाहून आत्या आणि तिच्या नवऱ्याला संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. हरियाणातील रोहतकमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रकार घडला होता.

संबंधित बातम्या :

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मुलीने पोलिसांना सांगितलं बाबांना किचनमध्ये पुरलंय!

मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI