ATS Recreate Scene | मनसुख हिरेन यांचा मृतदेह भरतीवेळी टाकला, ओहोटीमुळे सापडला? नाट्य रुपांतरणात काय काय समोर?

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्यादिवशी मुंब्रा रेतीबंदर परिसरात सापडला, त्यादिवशी म्हणजे 5 मार्च रोजी पहाटे खाडीला भरती होती (High Tide And Low Tide Timings).

ATS Recreate Scene | मनसुख हिरेन यांचा मृतदेह भरतीवेळी टाकला, ओहोटीमुळे सापडला? नाट्य रुपांतरणात काय काय समोर?
mansukh hiren

ठाणे : मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर ज्यांची स्कॉर्पिओ सापडली होती, त्या मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह (High Tide And Low Tide Timings) मुंब्रा रेतीबंदर परिसरात 5 मार्च रोजी आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे दिल्यानंतर ATS ने मुंब्रा रेतीबंदर परिसरात येऊन हा संपूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (ATS Team Recreate The Scene At Mumbra Retibandar High Tide And Low Tide Timings)

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्यादिवशी मुंब्रा रेतीबंदर परिसरात सापडला, त्यादिवशी म्हणजे 5 मार्च रोजी पहाटे खाडीला भरती होती. मात्र, त्यानंतर दिवस उजाडताच ओहोटी सुरु झाली आणि त्यामुळेच मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण 4 आणि 5 मार्चच्या भरती आणि ओहोटीच्या वेळा टीव्ही-9 मराठीच्या हाती आल्या आहेत.

💠 हिरेन मनसुख हे 4 मार्च रोजी रात्री उशिरा घरातून बाहेर पडले.

💠 त्यादिवशी रात्री खाडीला 1.31 मीटरची ओहोटी होती.

💠 त्यानंतर 5 मार्चच्या पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी खाडीला 3.67 मीटरची भरती आली.

💠सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी खाडीला 00.78 मीटरची ओहोटी लागली.

त्यामुळे हिरेन यांचा मृतदेह भरती असताना खाडीत टाकला गेला असावा आणि सकाळी ओहोटी लागल्यामुळे तो किनाऱ्याला लागला असावा, अशी शक्यता या आकडेवारीनुसार व्यक्त होतेय.

ही सगळी आकडेवारी एटीएसनेही घेतली असून त्यादृष्टीने 10 आणि 11 मार्चच्या रात्री एटीएसने मुंब्रा रेतीबंदर भागात क्राईम सीनचं रिक्रिएशन, म्हणजेच नाट्यरुपांतर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मात्र, 4 आणि 5 मार्च रोजी पहाटेची भरती आणि दुपारची ओहोटी होती. तर 10 आणि 11 मार्च रोजी पहाटेची ओहोटी आणि दुपारची भरती होती. त्यामुळे यातून काही धागेदोरे एटीएसच्या हाती लागतात का? किंवा काही निष्कर्षाप्रत एटीएसची टीम पोहोचते का? हे पाहावं लागणारेय.

भरती ओहोटीचं संपूर्ण वेळापत्रक :

4 मार्च –

4.50 – 03.97 मीटर 11.20 – 00.63 मीटर 17.45 – 03.75 मीटर 23.45 – 01.31 मीटर

5 मार्च –

05.20 – 03.67 मीटर 11.45 – 00.78 मीटर 18.45 – 03.56 मीटर 00.30 – 01.66 मीटर

10 मार्च –

06.00 – 01.54 मीटर 12.00 – 02.99 मीटर 17.54 – 00.99 मीटर 00.30 – 03.89 मीटर

11 मार्च –

07.00 – 01.39 मीटर 12.45 – 03.20 मीटर 18.45 – 00.88 मीटर 01.20 – 04.01 मीटर

ATS Team Recreate The Scene At Mumbra Retibandar High Tide And Low Tide Timings

संबंधित बातम्या :

सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, त्यांच्यासाठी अ‍ॅड. उद्धव ठाकरे आहेत, फडणवीसांचा जोरदार पलटवार

सचिन वाझे स्वत:हून ATS समोर हजर; 10 तास कसून चौकशी, धनंजय गावडेंबद्दल काय म्हणाले?

Published On - 1:31 pm, Fri, 12 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI