AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये नऊ वर्षीय मुलाची आत्महत्या, मोबाईल गेम खेळायच्या नादात आयुष्य संपवलं

मोबाईल गेम खेळायच्या नादात आत्महत्या केल्याचा दावा आहे. नाशिकमधील अवधूत वाडी, पंचवटी परिसरात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

नाशिकमध्ये नऊ वर्षीय मुलाची आत्महत्या, मोबाईल गेम खेळायच्या नादात आयुष्य संपवलं
नाशकात बालकाची आत्महत्या
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 8:09 AM
Share

नाशिक : नऊ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची (Child Suicide) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरी गळफास घेऊन बालकाने आयुष्य संपवल्याचा आरोप केला जात आहे. मोबाईल गेम खेळायच्या (Mobile Game) नादात आत्महत्या केल्याचा दावा आहे. नाशिकमधील अवधूत वाडी, पंचवटी परिसरात हा प्रकार (Nashik Crime News) घडल्याचं समोर आलं आहे. नाशिकमध्ये 15 वर्षांच्या मुलाच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. चिमुरड्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरावर शोककळा पसरली आहे. चिमुरड्याच्या आत्महत्येनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसात दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

दुसरीकडे, मित्राच्या वाढदिवसाला जायला कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे संतापलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये समोर आली होती. 15 वर्षीय विद्यार्थ्याने पंख्याला गळफास लावून आयुष्याची अखेर केली होती. नाशिक जिल्ह्यात सिन्नर येथे शनिवारी 14 मे रोजी रात्री 8 वाजता घडलेल्या या घटनेबाबत संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

देवी रोड परिसरातील राम नगरमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याच्या मित्राची शनिवारी शहरातील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी होती. त्याला पार्टीला जायचे होते, त्याने पार्टीला जाण्याची तयारी केली होती, पण त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पार्टीला जाऊ दिले नाही. याचा राग आल्याने त्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

रुसलेल्या विद्यार्थ्याची खोलीत जाऊन आत्महत्या

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाता न आल्याने नाराज झालेला विद्यार्थी घरातील एका खोलीत जाऊन बसला होता. कुटुंबातील इतर सदस्य दुसऱ्या खोलीत टीव्ही पाहत होते. टीव्ही पाहिल्यानंतर घरातील सदस्य आतल्या खोलीत निघाले, तेव्हा त्यांना खोली बंद असल्याचे दिसले.

नातेवाईकांनी दरवाजा ठोठावला मात्र विद्यार्थी बाहेर न आल्याने दरवाजा तोडण्यात आला. घरातील लोक दरवाजा तोडून खोलीत पोहोचले असता त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.