गँगरेपचे व्हिडीओ शूट, अल्पवयीन मुलीची आत्महत्या, लातुरातील रुग्णालयात कुटुंबीयांचा टाहो

आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने विषारी औषध घेतले होते. लातूरच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते, मात्र सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

गँगरेपचे व्हिडीओ शूट, अल्पवयीन मुलीची आत्महत्या, लातुरातील रुग्णालयात कुटुंबीयांचा टाहो
परभणीतील बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 8:24 AM

लातूर : लातूरच्या शासकीय रुग्णालयात परभणी जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप असून त्यानंतर तिने विषारी औषध प्यायले होते. गँगरेप प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. लातुरातील रुग्णालयात कुटुंबीयांनी अक्षरशः टाहो फोडला.

नेमकं काय घडलं?

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर आरोपीने मोबाईलमध्ये तिचा व्हिडीओ शूट केला आणि बदनाम करुन त्रास देण्याची धमकीही दिली.

आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने विषारी औषध घेतले होते. लातूरच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते, मात्र सोमवारी तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर भाजपाच्या उपाध्यक्षा स्वाती जाधव यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

काय आहे प्रकरण?

पीडित मुलगी ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. गावातील मुलगा आदर्श शिंदे हा पीडितेची वारंवार छेड काढायचा. पीडितेने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली. पीडितेच्या कुटुंबियांनी आदर्शला समजावून सांगितलं. त्यानंतर सर्व प्रकरण मिटलं असेल, असं पीडितेच्या कुटुंबियांना वाटलं. पण प्रकरण मिटण्याऐवजी आणखी चिघळलं होतं.

14 सप्टेंबरला दुपारी एक वाजता पीडितेने विषारी द्रव्य प्राशन केलं. त्यामुळे पीडितेला उलट्या होऊ लागल्या. पीडितेच्या आईने तिला त्यामागील कारण विचारलं असता तिने विष प्राशन केल्याचं सांगितलं. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू

पीडितेच्या आईने तातडीने घरातील इतर सदस्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पीडितेला तातडीने आंबेजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचारानंतर पीडितेला पुढील उपचारासाठी लातूरला नेण्यात आलं. पीडितेने जवळपास सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. पण तिची ही झुंज अखेर अपयशी ठरली. लातूरच्या रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.

भावाला सांगितलेलं आत्महत्येचं कारण

पीडितेने आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला? याबाबतची माहिती तिने स्वत: 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आपल्या भावाला सांगितली होती. पीडितेने भावाला दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाच या दरम्यान आदर्श शिंदे याने फोन करुन तरुणीला गावाजवळील एका पडक्या शाळेत बोलावले. यावेळी तिथे त्याच्यासोबत मयुर मुंजा मुठाळ, सुशिल भागवत शिंदे हे दोघंही होते. त्या तिघांनी मिळून पीडितेवर बलात्कार केला. त्यामुळे मानसिकरित्या खचलेल्या पीडितेने 14 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

लग्नाहून परतताना तरुणीवर सामूहिक बलात्कार, लिफ्टच्या बहाण्याने तिघांकडून अत्याचार

हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.