पुणे ते सोलापूर, चार जिल्ह्यात 14 लाखांच्या 29 बाईक्सची चोरी, मोठ्या टोळीचा पर्दाफाश

पंढरपूर शहर चंद्रभागा बस स्टँड येथे इंदापूर येथून चोरीस गेलेली दुचाकी विक्री केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.

पुणे ते सोलापूर, चार जिल्ह्यात 14 लाखांच्या 29 बाईक्सची चोरी, मोठ्या टोळीचा पर्दाफाश
पंढरपुरात आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश

पंढरपूर : राज्यस्तरावर दुचाकीची चोरी करुन विक्री करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात पंढरपूर शहर पोलिसांना यश आले आहे. चार जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून सुमारे 14 लाख रुपये किमतीच्या 29 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दोन चोर आणि दोघा विक्रेत्यांना पोलिसांनी गजाआड केल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

पंढरपूर शहर चंद्रभागा बस स्टँड येथे इंदापूर येथून चोरीस गेलेली दुचाकी विक्री केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. मोटर सायकल चोरी प्रकरणात पोलिसांनी महेश कांतीलाल नवले आणि सिद्धार्थ उर्फ अमर संजय मुसळे यांना अटक केली.

कुठून-कुठून बाईक चोरी?

त्यानंतर पोलिसांकडून टोळीचा भांडाफोड करण्यात आला. या दोघांनी पंढरपूर, इंदापूर, माळशिरस, नातेपुते, अकलूज, यवत, कोथरुड, सांगली, खडक, बारामती अशा ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्या. त्यांची विक्री करण्याचे काम सदाशिव फरतडे आणि सोमानाथ उर्फ दादा वाघमारे यांनी केले.

14 लाखांच्या 29 बाईक्सची चोरी

पंढरपूर पोलिसांनी या चौघांना अटक करून 14 लाख रुपये किमतीच्या 29 मोटारसायकली जप्त करून मोटरसायकलची चोरी व विक्री करणारी राज्यस्तरीय टोळी गजाआड केली.

नागपुरात यूट्यूबवरून चोरीचं प्रशिक्षण

दरम्यान, गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी नागपुरात एका अल्पवयीन प्रेमवीराने यूट्यूबवरून चोरीचं प्रशिक्षण घेतलं. आरोपीने साधी-सुधी नव्हे तर थेट ‘रेसिंग बाईक’ची चोरी केली. गेल्या वर्षी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

संबंधित बातम्या :

यू-ट्यूबवरून चोरीचं प्रशिक्षण, गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी ‘रेसिंग बाईक’ची चोरी

कल्याण-डोंबिवलीत केटीएम बाईकच्या सहाय्याने चोरी, चोरट्याला अटक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI