AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Drugs : मुंद्रा पोर्ट ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई; दिल्लीतील व्यावसायिकासह दोघांना अटक

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्यात अडकलेला दिल्ली-एनसीआरमधील प्रसिद्ध रेस्टॉरंट व्यावसायिक कबीर तलवार याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. तो दिल्लीतील सम्राट हॉटेलमध्ये प्लेबॉय बार चालवतो.

Delhi Drugs : मुंद्रा पोर्ट ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई; दिल्लीतील व्यावसायिकासह दोघांना अटक
मुंद्रा पोर्ट ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाईImage Credit source: tv9
| Updated on: Aug 25, 2022 | 10:52 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या वर्षी गुजरातसह संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिलेल्या मुंद्रा पोर्ट ड्रग्ज (Mundra Port Drugs) प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज मोठी कारवाई करीत दिल्लीतील एका नामांकित व्यावसायिकासह दोघांना अटक (Arrest) केली आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्यात अडकलेला दिल्ली-एनसीआरमधील प्रसिद्ध रेस्टॉरंट व्यावसायिक कबीर तलवार याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. तो दिल्लीतील सम्राट हॉटेलमध्ये प्लेबॉय बार चालवतो. त्याचे फक्त दिल्ली एनसीआरमध्येच नाही तर दुबईतही रेस्टॉरंट आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हरप्रीत सिंग तलवार उर्फ कबीर तलवार आणि प्रिन्स शर्मा या दोघांचा समावेश आहे. दोघेही दिल्लीचे रहिवासी आहेत. ते अफगाणिस्तानातून भारतात आणलेल्या हेरॉईनच्या मोठ्या खेपाच्या तस्करीत सामील होते.

तलवार हा अफगाण नागरिकांकडून ड्रग्ज खरेदी करायचा

गेल्या वर्षी गुजरातमधील मुंद्रा बंदरातून सुमारे 3000 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. हे हेरॉईन अफगाणिस्तानातून सागरी मार्गाने आणल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले होते. या प्रकरणात एनआयएने आधी दिल्लीतील व्यापारी तलवारची चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक केली आहे. हेरॉईनच्या मोठ्या साठ्याचे वितरण तसेच खरेदीमध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही सहभाग होता. तलवार हा अफगाण नागरिकांकडून ड्रग्ज खरेदी करत होता आणि दुबईमार्गे पैसे पाठवत होता, असा दावा करण्यात आला आहे. रिफाइंड ड्रग्ज कथितरित्या व्यावसायिकाने प्रसारित केले होते आणि उर्वरित औषधे पंजाबमध्ये पाठवली जात असल्याचेही एनआयएमधील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

तस्करीतून जमा झालेला पैसा दहशतवादी कारवायांसाठी पाठवल्याचा एजन्सीला संशय

एनआयएने या प्रकरणाच्या आरोपपत्रात सुरुवातीला 16 आरोपींचा उल्लेख केला होता. एजन्सीला संशय आहे की या तस्करीतून जमा झालेला पैसा दहशतवादी कारवायांना निधी देण्यासाठी अफगाणिस्तानात पाठवला गेला असावा. या प्रकरणी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी असलेल्या संबंधांचीही चौकशी करण्यात येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने बुधवारी या प्रकरणात दिल्ली, कोलकाता, पंजाब आणि गुजरातमधील अनेक ठिकाणी छापे टाकले होते, असे ‘द प्रिंट’च्या वृत्तामध्ये म्हटले आहे. दिल्लीतील हॉटेल सम्राटमधील एका खासगी क्लबवरही छापा टाकण्यात आला होता, ज्याच्या मालकाची बुधवारी चौकशी करण्यात आली, असे सूत्रांच्या अहवालातून सांगण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय व कारवाई कोणती केली होती?

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुजरातच्या मुंद्रा बंदरातून सुमारे 3,000 किलो हेरॉईनची एक मोठी खेप जप्त केली होती. ज्याची किंमत तब्बल 21,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. तो माल “मेसर्स आशी ट्रेडिंग कंपनी”द्वारे आयात केला जात होता आणि इराणच्या बंदर अब्बास बंदराच्या माध्यमातून मेसर्स हसन हुसैन लि. कंदाहार, अफगाणिस्तानकडून निर्यात केला जात होता. अफगाणिस्तानातून आलेल्या ‘सेमी-प्रोसेस्ड टॅल्क स्टोन’च्या आयात मालामध्ये अंमली पदार्थ लपवून ठेवलेले आढळले होते. (Major Action in Mundra Port Drugs Case, Two arrested, including a businessman from Delhi)

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.