आजोबा कसला? सैतानच… आई-वडील ऑफिसला जाताच नराधमाचं नातीसोबत पाशवी कृत्य; मुंबई हादरली

अवघ्या 13 वर्षांच्या नातीला वासनेची शिकार करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजोबा कसला? सैतानच... आई-वडील ऑफिसला जाताच नराधमाचं नातीसोबत पाशवी कृत्य; मुंबई हादरली
क्राईम न्यूज
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 11:02 AM

राज्यात मुली-महिलांवरील अत्याचाराच्य घटना दिवसेंदिवस वाढतच असून कधी बाहेरचे तर कधी घरातलेच हे हैवानी कृत्य करताना समोर येत आहेत. अशातच मुंबईत आता पुन्हा अशीच एक भयानक घटना घडली असून आजोबांनीच त्यांच्या नातीवर अत्याचा केल्याचे उघड झाले आहे. अवघ्या 13 वर्षांच्या नातील वासनेची शिकार करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम व्यक्तीला पवई अटक करण्यात आली आहे.

त्याच्याविरोधात बलात्कार आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांतच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे शहरात मोठी खळबळ माजली असून मुली-महिला सुरक्षित कधी जगू शकणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

आई-वडील कामावर जाताच आजोबा साधायचे संधी

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघी 13 वर्षांची असून ती आई-वडिलांसह पवई येथे राहते. तिच्या चुलत आजोबांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. गेल्या महिन्याभरापासून हा घृणास्पद प्रकार सुरू होता. पीडित मुलीचे आई-वडील हे कामावर गेल्यावर तो नराधम इसम संधी साधायचा आणि त्या मुलीवर अत्याचार करायचा. तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगितलं तर जीवानिशी मारेन अशी धमकीही त्याने पीडित मुलीला दिली होती. त्यामुळे ती निमुटपणे हा अत्याचार सहन करत होती.

मात्र काही दिवसांनी त्रास होऊ लागल्याने तिने कशीबशी हिंमत गोळा करत घडलेल्या प्रकाराबाबत तिच्या आईला सांगितलं. नराधम नातेवाईकाचं हे कृत्य आणि मुलीला काय काय सोसाव लागलं हे ऐकून त्या मालीच्या पायाखालची जमीनच सरकली. घरच्यांना सर्व प्रकार सांगितल्यावर तेही हादरले. मात्र घडलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे या हेतूने त्यांनी पोलिसांत धाव घेतील. पवई पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर त्या नराधमाविरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. काही तासांतच आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या, याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.