अयोध्येत रक्तपात, मुलीला सासरी पाठवण्यास वडिलाचा नकार, जावयाकडून तलवारीने सहा जणांवर वार

उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे (Man attack on his wife family in Ayodhya).

अयोध्येत रक्तपात, मुलीला सासरी पाठवण्यास वडिलाचा नकार, जावयाकडून तलवारीने सहा जणांवर वार
अटक

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे (Man attack on his wife family in Ayodhya). अयोध्येच्या कूरेभार गावात चतुर पुरवा भागात राहणारे मिठाईलाल यांच्या कुटुंबातील सहा जणांवर त्यांच्याच जावायाने तलवारीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात मिठाईलाल, त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अयोध्येच्या कुमारगंज येथील मुकेश प्रजापती या तरुणाचं चतुर पुरवा येथील अनिता सोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांनी अनिता आपल्या माहेरी निघून आली. त्यानंतर ती बराच वेळ सासरी गेली नाही. अनिताचा पती मुकेश दोन दिवसांपूर्वी (19 डिसेंबर) त्याच्या सासुरवाडीला पत्नीला घेण्यासाठी गेला. यावेळी त्याचा सासरे मिठाईलाल यांच्यासोबत वाद झाला. मिठाईलाल आपल्या मुलीला सासरी पाठवण्यास इच्छुक नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. या वादातून मुकेशने आपल्या सासऱ्यावर तलावारीने वार केला.

मुकेशने सासऱ्यावर तलवारीने वार केल्यानंतर घरात गोंधळ सुरु झाला. घरातील इतर सदस्य मिठाईलाल यांना वाचवण्यासाठी पुढे आले. मुकेशने त्यांच्यावरदेखील तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात मुकेशची पत्नी अनिता, सासू दुर्गावती, मेहुनी मनिषा आणि ज्ञानमती गंभीर जखमी झाले.

पत्नीचे तीन बोटं कापली

मुकेशने आपल्या पत्नीवरही तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात त्याने पत्नीच्या हाताचे तीन बोटं कापले. घरातील गोंधळाचा आवाज ऐकून शेजारचे घरात शिरले. त्यांनी तातडीने मुकेशला पकडलं. त्याच्या हातातून तलवार काढून घेतली. त्यानंतर त्याला झाडाला बांधून प्रचडं चोप दिला.

अखेर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुकेशला अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेली तलवार जप्त केली. मुकेश हल्ला करण्याच्याच इराद्याने आला होता, असा दावा त्याच्या सासरच्यांनी केला आहे (Man attack on his wife family in Ayodhya).

हेही वाचा:

चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करुन जिवंत गोणीत बांधून फेकले, पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकलीला जीवनदान

महाराष्ट्रात किती टक्के महिलांवर पतीकडून हिंसाचार? NHS च्या अहवालात धक्कादायक खुलासे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI