AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धावत्या बसमधून डोकावणं जीवावर, ट्रकच्या धडकेत प्रवाशाचं डोकं उडालं

मुरलीटोलला उतरण्याच्या दोन किलोमीटर आधीच काळाने प्रवाशावर घाला घातला (bus Begusarai Bihar Truck head)

धावत्या बसमधून डोकावणं जीवावर, ट्रकच्या धडकेत प्रवाशाचं डोकं उडालं
प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 25, 2021 | 2:06 PM
Share

पाटणा : धावत्या बसमधून डोकं बाहेर काढणं प्रवाशाच्या जीवावर बेतलं. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे त्याचं डोकं चिरडलं गेलं. त्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बिहारमधील बेगुसरायमध्ये हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. त्यानंतर बसमधील इतर प्रवाशांचे चित्कार ऐकायला मिळाले. (Man in bus window seat dies in Begusarai Bihar after Truck hits head)

खिडकीतून वाकणाऱ्या प्रवाशाला ट्रकची धडक

बेगुसरायमधील बछवारा भागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 28 वर हा अपघात झाला. मंगळवारी संध्याकाळी 35 वर्षीय रणजीत राय बसने घरी चालला होता. त्यावेळी रणजीत बसच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून वाकून पाहत होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने आलेला ट्रक बसच्या अत्यंत जवळून गेला. त्यामुळे त्याचं डोकं चिरडलं गेलं. अपघातात रणजीतचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह बसच्या खिडकीतच लटकत होता.

उतरण्याच्या दोन किमी आधीच अपघात

रणजीत हा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील बछवारा क्षेत्रातील लोदीयाही गावाचा रहिवासी होता. बेगुसरायहून मुझफ्फरपूर जाणाऱ्या बसने तो प्रवास करत होता. मुरलीटोलला तो उतरणार होता, मात्र त्याच्या दोन किलोमीटर आधीच काळाने त्याच्यावर घाला घातला. झमटिया गावाजवळ हा अपघात झाला. पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. रणजीतचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.

कंडक्टरच्या माहितीनुसार बजावूनही रणजीत खिडकीत मान बाहेर काढून वाकत होता. ट्रकच्या धडकेत त्याचं मुंडकं उडाल्यानंतर बसमधील प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं. काही जण निशब्द झाले, तर काही जणांचे चित्कार बाहेर पडत होते. त्यानंतर तातडीने बस साईडला लावून पोलिसांना बोलावण्यात आले.

रणजीतच्या कुटुंबाचा चालकांवर आरोप

रणजीतच्या कुटुंबीयांनी बस आणि ट्रक चालकावर निष्काळजी बाळगल्याचा आरोप केला आहे. मात्र प्रवास करताना वाहनाबाहेर डोकं किंवा शरीराचा कोणताही भाग काढू नये, अशा सूचना वारंवार केल्या जातात. प्रवाशांनी त्याचं पालन करावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

अंबरनाथ लोकलमध्ये शिर आढळलं

रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करणं किती जीवघेणं ठरु शकतं, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आलंय. दरवाजात लटकून प्रवास करताना रेल्वेच्या खांबाला डोकं आपटून शिर धडावेगळं झाल्याची घटना मुंबईजवळच्या अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ लोकलमध्ये रात्री एक वाजता धड नसलेलं शिर लगेजच्या डब्यात सापडल्याने ही घटना उघडकीस आली.

संबंधित बातम्या :

अंबरनाथ लोकलमध्ये धड नसलेलं शिर, लगेजच्या डब्यात रात्री एक वाजता घटना उघड

(Man in bus window seat dies in Begusarai Bihar after Truck hits head)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.