अंबरनाथ लोकलमध्ये धड नसलेलं शिर, लगेजच्या डब्यात रात्री एक वाजता घटना उघड

अंबरनाथ लोकलमध्ये धड नसलेलं शिर, लगेजच्या डब्यात रात्री एक वाजता घटना उघड
प्रातिनिधीक फोटो

लोकल यार्डात जात असताना लगेजच्या डब्यात एक धड नसलेलं शिर पडलं असल्याचं स्टेशन मास्तरांनी पाहिलं (Ambernath Local Head Central Railway)

अनिश बेंद्रे

|

Mar 24, 2021 | 5:07 PM

अंबरनाथ : रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करणं किती जीवघेणं ठरु शकतं, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आलंय. दरवाजात लटकून प्रवास करताना रेल्वेच्या खांबाला डोकं आपटून शिर धडावेगळं झाल्याची घटना मुंबईजवळच्या अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ लोकलमध्ये रात्री एक वाजता धड नसलेलं शिर लगेजच्या डब्यात सापडल्याने ही घटना उघडकीस आली. (Ambernath Local Head found Dead body near Ulhasnagar on Central Railway)

स्टेशन मास्तरांना शिर सापडलं

अंबरनाथ रेल्वे स्थानकात काल रात्री एक वाजता अंबरनाथ लोकल आली. ही लोकल यार्डात जात असताना लगेजच्या डब्यात एक धड नसलेलं शिर पडलं असल्याचं स्टेशन मास्तरांनी पाहिलं. याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी हे शिर ताब्यात घेत धडाचा शोध सुरू केला.

उल्हासनगर- अंबरनाथच्या मध्ये धड आढळलं

ज्या डब्यात हे शिर आढळलं होतं, त्या डब्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रक्त उडालं होतं. त्यामुळे पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने शोध घेतला असता उल्हासनगर आणि अंबरनाथच्या मध्ये हे धड आढळून आलं. या व्यक्तीचं नाव हितेंद्र राजभर असल्याचं तपासात समोर आलं.

दरवाजात लटकताना डोकं खांबावर आपटलं

हितेंद्र हा रात्री पाऊण वाजताच्या सुमारास उल्हासनगरहून अंबरनाथला यायला निघाला, मात्र दरवाजात उभा असताना अचानक त्याचं डोकं खांबाला आपटलं. ही धडक इतकी जोरदार होती, की त्याचं शिर धडावेगळं होऊन डब्यात पडलं, तर धड खाली पडलं.

या प्रकरणी आणि जीआरपीचे एसीपी सुनील पाटील यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. यानंतर हा घातपात नसून अपघातच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या घटनेमुळे लोकलच्या दारात उभं राहून प्रवास करणं किती जीवघेणं ठरू शकतं, हे पुन्हा एकदा समोर आलंय.

संबंधित बातम्या :

शिरोळमध्ये आधी भाच्यानं मावशीवर सपासप वार केले, नंतर थेट पोलीस ठाणं गाठलं, हे सगळं का कशामुळे घडलं?

लोकलमधून चोरट्याचा बिनबोभाट प्रवास; मोबाईल चोरताना प्रवाशांकडून चोप

(Ambernath Local Head found Dead body near Ulhasnagar on Central Railway)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें