शिरोळमध्ये आधी भाच्यानं मावशीवर सपासप वार केले, नंतर थेट पोलीस ठाणं गाठलं, हे सगळं का कशामुळे घडलं?

शिरोळ तालुक्यात प्रॉपर्टीच्या वादातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे (Nephew Murder Aunty).

  • साईनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी
  • Published On - 15:35 PM, 8 Mar 2021
शिरोळमध्ये आधी भाच्यानं मावशीवर सपासप वार केले, नंतर थेट पोलीस ठाणं गाठलं, हे सगळं का कशामुळे घडलं?
Murder

इचलकरंजी : शिरोळ तालुक्यात प्रॉपर्टीच्या वादातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे (Nephew Murder Aunty). या घटनेच भाच्यानेच मावशीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर आज दुपारी संशयितांना जयसिंगपूर न्यायालयात हजर करण्यात आले (Maharashtra Crime News Nephew Murder Aunty In Ichalkaranji Kolhapur).

भाच्याकडून मावशीची हत्या

सतत होणारी शिवीगाळ आणि घालून पाडून बोलण्याला कंटाळून शिरोळमधील टाकवडे येथे भाचा गणेश गोपाळ गायकवाड (वय 26) याने मित्र प्रतिक बाबासो पाटील (वय 22) या दोघांनी यांत्रिकी मागाचा लाकडी मारा आणि धारदार कोयत्याने मान, पाठीवर आणि डोक्यावर तसेच पोटावर वार करुन मावशी अंजना चंद्रकांत शिंदे (वय 53) यांची हत्या केली. ही घटना रविवारी (7 मार्च) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. खुनाची पोलिसांत नोंद झाली असून दोघा संशयिताना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज दुपारी संशयितांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केले. याप्रकरणी मुलगी अमृता गणेश मानेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हत्येची घटना पाहून परिसर हादरला

घरासमोरील अंगणाजवळच्या रस्त्यावर खुनाचे नाट्य पाहून परिसर हादरुन गेला. रक्ताचा पाट आणि उडालेले थारोळे पाहताना अक्षरशः अंगावर शहारे आले. घटनेनंतर परिसरात काही तास स्मशान शातंता पसरली होती, असं नागरिकांनी सांगितलं.

टाकवडे पोलीस पाटील सारिका गणेश कांबळे यांच्याकडून वर्दी मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करुन पंचनामा केला. दरम्यान, दोघे संशयीत आरोपी, लोक आम्हाला मारतील या भितीने शिरढोण रोडवरुन पळून गेले.

त्यांनी रस्त्यात वापरलेला लाकडी मारा आणि कोयता रस्त्याकडेला एका काटेरी झुडपाजवळ टाकून दिला. शिरोळ साखर कारखान्याकडे ऊस भरुन येणाऱ्या एका ट्रॅक्टराला हात करुन रात्री ते पोलीस ठाण्यात हजर झाले.

जमिनीच्या वादातून हत्या

मृत्त अंजना या संशयित आरोपीची मावशी होत्या. यांच्यात वडीलोपार्जित जागेतील वारस हक्काचा वाद होता. वारसाप्रमाणे प्रत्येकाला जागा वाटप करण्यात आल्या आहेत. पण अंजना यांना रिकाम्या जागेबरोबर संशयित आरोपी गणेशने ग्रामपंचायत घरकुल योजनेतून बांधलेल्या घरात वाटणी हवी होती. यासाठी कुटूंबात वारंवार वाद होत होता.

गणेश हा आई, वडील आणि आजी बरोबर मावशीलाही जेवणाचा डबा देवून सांभळत होता. मावशी शिवीगाळ करुन अंगावर मारण्यासाठी येत असल्यायाने तो त्रस्त होता. संशयित गणेश हा इचलकरंजी येथील एका इंडस्ट्रीमध्ये कॉम्प्युटर डिझायनर म्हणून आणि प्रतिक हा फिटर म्हणून काम करतात. कामावरुन येताना त्यांना टाकवडे गावाजवळच्या पडीक बल्लारी शेताच्या कडेला कोयता सापडला. तो ते घेवून घरी आले.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा अंजनाने शिवीगाळ सुरु केल्याने दोघा संशयितांमध्ये चर्चा झाली. यादरम्यान, गणेशने मावशीच्या मानेवर, पाठीवर आणि पोटावर कोयत्याने सपासप वार करुन जखमी केले. तर प्रतिकने लाकडी माऱ्याने त्यांच्या डोक्यात मारले.

Maharashtra Crime News Nephew Murder Aunty In Ichalkaranji Kolhapur

संबंधित बातम्या :

मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह, अहमदनगरमध्ये भाजप तालुकाध्यक्षाचा जावयावर हल्ला

वरळीच्या NSCI क्लबच्या उपकंत्राटदाराचा बेसमेंटमध्ये गळफास, सुसाईड नोट सापडली