AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊबीजेला दोघी बहिणी आनंदाने घरी गेल्या पण…

भाऊबीजेचा सण भावा-बहिणींच्या प्रेमाचा, अतिशय खास असा दिवस असतो. भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणी प्रार्थना करतात, तर भाऊ हे बहिणीच्या सुखासाठी, सुखी संसारासाठी देवापुढे डोकं टेकून प्रार्थना करतात. मात्प याच पवित्र सणाच्या दिवशी एखाद्याचा संसार उद्ध्वस्त झाला तर ?

भाऊबीजेला दोघी बहिणी आनंदाने घरी गेल्या पण...
क्राईम न्यूज
| Updated on: Nov 04, 2024 | 10:38 AM
Share

देशभरात दिवाळी  उत्साहाने,  आनंदाने साजरी झाली. काल दिवाळीचा शेवटचा दिवस, भाऊबीजेचा सणही उत्साहात , प्रेमाने साजरा झाला. भावा-बहिणीच्या प्रेमाचा हा सण लोक आनंदाने साजरा करतात. मात्र याच सणाला गालबोट लावणारी एक भयानक घटना घडली ज्यामुळे एकच गदारोळ माजला. जिथे आनंद होता, हसण्याचे आवाज येत होते, तीच जागा क्षणभरात दु:खाने झाकोळून गेली, तिथे अश्रूंचा महापूर आला. असं नेमकं काय घडलं ? ज्या बहिणी आपल्या भावाच्या घरी त्याच्या सुखी आयुष्याची प्रार्थना करायला आल्या होत्या, त्याच बहिणींच आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्यांचं कुंकूच पुसलं गेलं. दिल्लीत भाऊबीजेसाठी दोन बहिणी भावाच्या घरी आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या पतींमध्ये काही कारणावरून वाद झाला. काही वेळातच पिस्तुलातून गोळीबार झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील खजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भयानक घटना घडली. भाऊबीजेच्या दिवशी पत्नीसह सासरच्या घरी गेलेल्या दोन मेव्हण्यांचे व्यवसायावरून भांडण झाले. मात्र तो वाद बघता बघता वाढला आणि त्यातच एका व्यक्तीने आपल्या मेहुणीच्या नवऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. संध्याकाळी 6.20 वाजता खजुरी खास पोलीस स्टेशन परिसरात गोळीबाराच्या घटनेबाबत फोन आला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक सोनिया विहारच्या पहिल्या पुस्ता ए ब्लॉकमध्ये घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटू हा भाड्याच्या घरात राहतो. रविवारी भाऊबीजेच्या निमित्ताने त्याच्या दोन बहिणी रेखा आणि चांदनी या त्यांचे पती अजय आणि हेमंतसोबत त्याला भेटायला आल्या. अजय आणि हेमंत हार बनवण्याचा एकच व्यवसाय करतात. मात्र सासरी पोहोचल्यानंतर अजय आणि हेमंत यांच्यात व्यवसायातील काही मुद्यावरून वाद सुरू झाला. बघता बघता तो वाद वाढला आणि रागावलेल्या अजयने हेमंतवर गोळीबार केला. त्यानंतर तो तेथून फरार झाला.

गोळीबारात जखमी झालेल्या हेमंतला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

तो BJPचा बोलका पोपट...उत्तर भारतीय महापौर, या वक्तव्यावर राऊतांची टीका
तो BJPचा बोलका पोपट...उत्तर भारतीय महापौर, या वक्तव्यावर राऊतांची टीका.
असं न्यू इअर सेलिब्रेशन पाहिलंय? मुंबई लाईफ-लाईनकडून नव वर्षाचं स्वागत
असं न्यू इअर सेलिब्रेशन पाहिलंय? मुंबई लाईफ-लाईनकडून नव वर्षाचं स्वागत.
शेगाव गजानन महाराजांच्या मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांची रीघ
शेगाव गजानन महाराजांच्या मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांची रीघ.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी.
शिर्डी साईंच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी
शिर्डी साईंच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी.
युतीमुळे इच्छुकांचा हिरमोड, बंडोबांना थंड करण्यायुचं ठाकरेंपुढे चॅलेंज
युतीमुळे इच्छुकांचा हिरमोड, बंडोबांना थंड करण्यायुचं ठाकरेंपुढे चॅलेंज.
महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपचे 6 नगरसेवक दणक्यात बिनविरोध विजयी
महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपचे 6 नगरसेवक दणक्यात बिनविरोध विजयी.
धंगेकरांचा भाजपविरोधात स्वबळाचा नारा तर दादांच्या NCPबद्दल काय भूमिका?
धंगेकरांचा भाजपविरोधात स्वबळाचा नारा तर दादांच्या NCPबद्दल काय भूमिका?.
18 ठिकाणी शिंदे एकटे म्हणून कॅबिनेटला दांडी? युती न झाल्यानं नाराज?
18 ठिकाणी शिंदे एकटे म्हणून कॅबिनेटला दांडी? युती न झाल्यानं नाराज?.
संभाजीनगरात रशीद मामूंना तिकीट अन् ठाकरे गटातील खैरे-दानवे भिडले
संभाजीनगरात रशीद मामूंना तिकीट अन् ठाकरे गटातील खैरे-दानवे भिडले.