AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिकाऱ्याला जिवंत जाळलं, स्वत:चा मृत्यू झाल्याचे भासवून विम्याचे 80 लाख हडपले.. 17 वर्षांनी उलगडलं ‘ते’ गुपित

या घटनेनंतर आरोपी अनिलने आपले नाव बदलून राजकुमार ठेवले. बनावट कागदपत्रे बनवून तो अहमदाबादमध्ये राहू लागला. अनिल दिल्ली आणि सुरतमध्ये आपल्या कुटुंबीयांना भेटायला यायचा. तब्बल 17 वर्षांनंतर त्याच्या कृत्याचा पर्दाफाश झाला.

भिकाऱ्याला जिवंत जाळलं, स्वत:चा मृत्यू झाल्याचे भासवून विम्याचे 80 लाख हडपले..  17 वर्षांनी उलगडलं 'ते' गुपित
| Updated on: Nov 09, 2023 | 8:51 AM
Share

अहमदाबाद | 9 नोव्हेंबर 2023 : पैशांचा मोह वाईट.. त्या मोहापायी एखादा माणूस कोणत्याही थराला जाऊन कोणतेही कृत्य करू शकतो. त्यावेळी तो चांगल्या वाईटाचा, योग्य- अयोग्य याचा काहीच विचार करत नाही. त्याला फक्त दिसत असतो तो पैसा. पण तो पैसा मिळवण्याच्या हव्यासापायी केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि नंतर हातात पश्चातापाशिवाय काहीही उरतच नाही.

अशाच एका भीषण कृत्याचा अहबदाबाद क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी खुलासा केला. क्राईम ब्रांचने एका अशा आरोपीला अटक केली, ज्याचा 17 वर्षांपूर्वी एका कार अपघातात होरपळून मृत्यू झाला होता. कुटुंबियांनी त्याचे अंत्यसंस्कारही केले होते. त्यानंतर कुटुंबियांनी त्याच्या नावे असलेले इन्श्युरन्सचे 80 लाख रुपयेही मिळवले. आता त्याच मृत इसमाला क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. हो हे खरं आहे… पण त्याच्या अटकेनंतर एक मोठ गुपित उलगडलं , ज्याचा खुलासा ऐकून पोलिसही चक्रावले. आरोपी अनिल सिंह उर्फ राजकुमार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

खरंतर, कार अपघातात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो तर एक भिकारी होता. विम्याची 80 लाख रुपयांची रक्कम हडपण्यासाठी त्या इसमाने भिकाऱ्याची हत्या केली. आपली ओळख मिटवण्यासाठी त्याने भिकाऱ्याचा मृतदेह गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर ठेवून जाळला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले होते.

गौतमबुद्ध नगर मधील रहिवासी आहे आरोपी

अहमदाबाद मधील क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचे खरे नाव अनिल सिंह असून तो गेल्या काही वर्षांपासून राजकुमार नावाने रहात होता. त्याला मनमोहन नगर निकोल येथून अटक केली. अनिल सिंह उर्फ राजकुमारने अत्यंत चलाखीने एलआयसी इन्शुरन्समधून त्याच्या नावावर असलेले 80 लाख रुपयेही मिळवले. आरोपी राजकुमारचे खरे नाव अनिल असून तो उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी उघड केली. त्यानंतर त्याने राजकुमारच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवली आणि 2006 सालापासून तो अहमदाबादमध्ये राहत होता.

जेवण देण्याच्या बहाण्याने भिकाऱ्याला कारमध्ये बसवलं

अखेर 17 वर्षांनी याप्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी अनिल सिंह याने त्याच्या कुटुंबीयांसह हा बनाव रचला. रस्ता अपघातात आपला मृत्यू झाल्याचे त्याने भासवले. त्यानंतर एलआयसीच्या विम्याचे पैसे हडप करण्याची त्याची योजना होती. त्यासाठी 2006 साली आरोपी हा त्याचे वडील विजयपाल सिंह आणि भाऊ अभय सिंह, नातेवाईक महिपाल गडरिया आणि राकेश खाटिक यांच्यासोबत आग्राला पोहोचले होते. आग्रा टोलटॅक्सजवळ एका भिकाऱ्याला जेवण देण्याचे बहाणा करून त्याला गाडीत बसवले. त्यानंतर त्याला झोपेची गोळी देण्यात आली आणि तो बेशुद्ध झाला. यानंतर त्यांनी भिकाऱ्याला गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवले आणि कार पेटवली. अशाप्रकारे भिकाऱ्याची हत्या केल्यानंतर आरोपींनी अनिल सिंगचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवले.

पोलिसांनी अटक करून तुरूंगात केली रवानगी

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर आरोपीने कागदावर स्वत:लाच मृत दाखवले. त्याच्या कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. आणि त्या इसमाच्या नावे असलेले विम्याचे 80 लाख रुपये कंपनीकडून घेतले. त्यानंतर अनिल सिंगने नाव बदलले आणि राजकुमार नावाने तो अहमदाबादमध्ये राहू लागला. तेथे त्याने ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅनकार्ड यांसारखी कागदपत्रेही बनावट नावाने बनवली गेली. पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल करून आग्रा पोलिसांशी संपर्क साधला आहे. आग्रा पोलिस भिकाऱ्याच्या हत्येचा गुन्हा दाखल करणार आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?